आत्ताच्या घडामोडी

३ विवाह आणि त्यात नक्षलवादी असलेला हा अभिनेता असा बनला बॉलीवूडचा स्टार

मुंबई | सलग ३३ चित्रपट फ्लॉप होऊनही डिस्को डान्सर बनून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा एकमेव अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती उर्फ मिथुन दा. १६ जून रोजी मिथुन आपला वाढदिवस साजरा करतो. नुकतीच त्याने वयाची ७२ री गाठली आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयाने त्याने आजवर लाखोंचा चाहता वर्ग गोळा केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आठवणीत त्याच्या आयुष्यातील एक खासगी गुपित माहीत करून घेणार आहोत.

 

बांगलादेश येथे १६ जून १९५० रोजी मिथुन दाचा जन्म झाला. त्याने बिएससीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे धडे घेतले. मात्र तुम्हाला माहीत आहे का? मिथुन दाचे खरे नाव वेगळे असून तो सुरुवातीला एक नक्षलवादी होता. त्याने नक्षलवादी संघटनेशी हात मिळवणी करून त्यात काम करायला सुरुवात केली होती.

 

त्याच्या या निर्णयाला त्याच्या घरांच्यांचा देखील विरोध होता. त्यांनी त्याला बऱ्याचदा अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र घरच्यांचं न ऐकता त्याने मोठ चूकच पाऊल चाललं. नक्षलवादाला साथ देत त्यांच्यात काम करत असताना त्याच्या आयुष्यात खूप दुःखद घटना घडली. या घटनेने त्याने ते काम कायमच सोडून दिलं.

 

एक दिवस तो नक्षलवादातील एका मोहिमेवर गेला होता. तिथे त्याचा एक मोठा अपघात झाला. या अपघाताने त्याला चांगलीच शिकवण दिली. त्यातून तो बचावला मात्र त्याचा भाऊ यात दगावला. या घटनेने मिथून दा खूप भयभीत झाला. त्यानंतर त्याला आपली चूक देखील समजली आणि तो घरी परतला. मग त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याचे नाव गौरंगा चक्रवर्ती असे होते.

 

त्याच्या या निर्णयानेच बॉलिवूडला कमालीचा डिस्को डान्सर भेटला. त्याने साल १९७६ मध्ये आपल्या अभियनयाच्या करिअरला सुरुवात केली. वयाच्या २६ व्या वर्षी त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मृगया हा त्याचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून त्याने मोठी झेप घेतली होती. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आलं होतं.

 

पहिलाच चित्रपट हिट ठरला असला तरी डिस्को डान्सर पर्यंतचा त्याचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. चित्रपटाच्या कारकिर्दीत त्याने ७० आणि ८० च्या दशकात मोठी कामगिरी केली. मात्र त्यानंतर साल १९९३ ते १९९८ पर्यंत त्याचे जवळपास ३३ चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र मिथुन दा सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याने खचून न जाता आणखीन मेहनतीने आपलं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर १९९९ मध्ये शेरा या चित्रपटातून पुन्हा एकदा दमदार अभिनयासह प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर त्याने मा कसम, सुलतान, आज आज का रावण, गौतम गोविंदा, कुली असे अनेक हिट चित्रपट देऊन नव्वदचे दशक गाजवले.

 

मिथुन दा चित्रपटांप्रमाणेच त्याच्या खाजगी लव लाइफ मुळे देखील नेहमी चर्चेत राहिला. १९७९ मध्ये त्याने अभिनेत्री हेलेना ल्यूकशी पहिले लग्न केले, परंतु लग्नाच्या ४ महिन्यांनंतर हे जोडपे वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर १९७९ मध्ये मिथुन दाने अभिनेत्री योगिता बालीशी लग्न केले. चक्रवर्ती आणि योगिता यांना चार मुले आहेत मिमोह, नमाशी, उष्मे आणि दिशानी अशी चार मुलं असून दिशानीला त्यांनी दत्तक घेतले होते.

 

आधीच दोन लग्नांमध्ये गुरफटलेल्या मिथुन दाचे बॉलीवूड मधील एका दिग्गज आणि नावाजलेल्या अभिनेत्रीबरोबर देखील अफेअर राहिले आहे. साल १९८४ मध्ये त्याने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी लग्नगाठ बांधली होती. पण १९८८ मध्ये घटस्फोट न घेता हे दोघे वेगळे झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button