महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या; कारण पाहून धक्काच बसेल

मिरज | आपल्या महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धती आहे. अनेक घरामध्ये आजही १० माणसांचं एकत्र कुटुंब पाहायला मिळत. अशात मिरज येथे एका कुटुंबात खूप मोठा धक्कादायक प्रकार घाडला आहे. एकाच कुटुंबात राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी विष पिऊन स्वतः च जीवन संपवलं आहे.

 

या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांगलीतील मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही हृदय हेलावणारी घटना घडली आहे. यामध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली आहे.

 

घरातील दोन भाऊ हे करते पुरुष होते. त्यांनी दोघांनी स्वतः विष पील आणि आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील विष पाजलं. यामध्ये पत्नी, आई आणि लहान मुलांचा समावेश आहे.

 

त्यामुळे या दोन भावांसह इतर सदस्य देखील मृत्यू पावले आहेत. अशात हे दोघे भाऊ वेगवेगळ्या घरात राहत होते. रविवारी रात्री दोघांनी मिळून कुटुंबाबरोबर आत्महत्या केली.

 

सोमवारी सकाळी ही माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. अद्याप या घटनेत आणखीन काही माहिती मिळाली नसून पोलीस शोध घेत आहेत. या कुटुंबाला ही विषाची परीक्षा का द्यावी लागली. असं काय घडलं की त्यांना सामूहिक आत्महत्येच पाऊल उचलावं लागलं असे अनेक प्रश्न यामुळे उभे राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button