आत्ताच्या घडामोडी

अभिनेते मिलिंद यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

Entertainment | मराठी कला विश्वात येऊन अनेक अभिनेत्यांनी त्यांचं करियर बनवलं आणि बॉलिवूड पर्यंत धडक मारली, देश पातळीवर सर्वाधिक दिग्गज अभिनेत्यांपैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणं सोपी गोष्ट नाही.

 

मात्र अनेक दिग्गजांनी हे अफलातून यश मिळविले आहे. यात आघाडीचे नाव म्हणजे मिलिंद गुणाजी, स्वतःच्या कष्टाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत एक मोठं यश मिळविले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

तसेच ते अनेक मोठ्या कार्यक्रमात देखील दिसले होते. मिलिंद यांनी फक्त मराठी मध्ये नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम केले आहे. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. मिलिंद यांच्या बाबत अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते.

 

त्यांच्या खासगी आयुष्यातील बरीच माहिती फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींबाबत माहिती सांगणार आहे. मिलिंद यांची पत्नी देखील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे.

 

त्यांच्या पत्नीचे नाव राणी गुणाजी असे आहे. त्या देखील एक प्रसिध्द अभिनेत्री आहेत. मिलिंद यांच्या यशामागे राणी यांचा मोठा हात आहे. प्रत्येक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राणी यांचं प्रोत्साहन असायचं, असे मिलिंद यांनी देखील अनेकवेळा सांगून दाखवलं आहे.

 

दिसायला सुंदर आणि अनेक वर्षापासून राणी आणि मिलिंद यांचा सुखाचा संसार सुरू आहे. राणी यांनी अद्याप पर्यंत बिग बजेट चित्रपटात काम केले नसले तरी त्यांना मिळेल ती भूमिका त्यांनी उत्तम साकारली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button