आत्ताच्या घडामोडी

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीने सोडली मालिका; धक्कादायक कारण समोर

मुंबई | माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका परी मुळे चांगलीच गाजत आहे. अनेक चाहते ही मालिका फक्त परी यामध्ये दिसणार म्हणून पाहत आहेत. अशात आता परी म्हणजेच मयराच्या चाहत्यांना नाराज करणारी एक बातमी समोर येत आहे.

 

मायरा या मालिकेतून आता ब्रेक घेणार आहे. मालिका सुरू झाल्यापासून मायराने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. अशात आता ती ब्रेक घेणार असल्याचं तिच्या आई वडिलांनी स्वतः हे सांगितलं आहे. त्यामुळे आता ती ब्रेक नेमकी का घेत आहे. तिला कुणी वाईट वागणूक देत आहे का? तिच्या शाळेसाठी ती ब्रेक घेत आहे का? अशा अनेक प्रश्नांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

 

मायरा वैकूळ ही बाल कलाकार या मालिकेत परी हे पात्र साकारते. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अशात तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मायरा एका रेल्वे स्टेशन जवळ आहे. तिच्या मागे एक ट्रेन देखील आहे आणि ती एका बॅगवर बसलेली आहे.

 

हा फोटो शेअर करत तिने याला कॅप्शन देखील दिलं आहे. या कॅप्शनमध्येच ती मालिकेतून ब्रेक का घेत आहे याचं उत्तर दडलेलं आहे. तर तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” वे टू कोकण…” मायरा तिच्या आई वडिलांबरोबर कोकणात फिरायला चालली आहे. इकडे ती तिच्या सुट्ट्या एन्जॉय करणार आहे.

 

त्यामुळेच आता पुढचे काही दिवस आपल्याला ती मालिकेमध्ये पाहायला मिळणार नाही. नुकतेच या मालिकेत नेहा आणि हर्षवर्धन या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. यामध्ये परीने देखील दमदार डान्स केला. लग्नासाठी तिने खूप सुंदर ड्रेस परिधान केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button