आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूड हादरलं! लोकप्रिय गायिकेचे दुःखत निधन

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय चित्रपट सृष्टीला धक्क्यावर धक्के मिळताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर, रमेश देव यांच्या सारखे दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आत्ता पुन्हा एका गायिकेचे निधन झाल्याचे वृत्त आले आहे.

 

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक चित्रपटात या गायिकेने 350 हून अधिक गाणी लिहली आहेत. तसेच त्या एक गायक देखील होत्या, त्यांनी काही बड्या मालिका देखील लिहल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

 

निधन झालेल्या गीतकाराचे नाव माया गोविंद असे आहे. त्यांनी 1972 रोजी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. त्यानंतर दिग्गज चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहली आहेत. मैं अनाडी तू खिलाडी, आखों मे बसे हो तुम, गले मे लाल टाई

असे दिग्गज 350 हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजतात. फिल्म इंडस्ट्रीत एकच शोककळा पसरली आहे. आज सकाळी त्यांनी मुंबई मधील घरी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

त्यांचा परिवार मोठा असल्याने अंतिम संस्कार करण्यासाठी वेळ जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे. माया यांना अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button