आत्ताच्या घडामोडीभारत

दुर्धर पायाच्या आजाराने ‘तो’ होता त्रस्त, ५० किलोचा पाय होऊन देखील त्याने सोडले नाहीत प्रयत्न

दिल्ली | मानवाला कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. मानवाला होणाऱ्या दुर्धर अजारांपैकी काही आजारांवर अद्याप उपचार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे काहींना अनेकवेळा प्राण गमवावे लागत आहेत.

 

असाच एक धक्कादायक आजार अमित कुमार शर्मा यांना झाला होता. त्या आजाराचे नाव लिम्फेडेमा असे आहे. त्याला मराठीत हत्तीचा रोग असेही बोलले जाते. या आजारावर अद्याप कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत.

 

अमित यांना या आजाराने ग्रासल्या नंतर त्यांनी देशातील अनेक रुग्णालयात उपचार घेतले मात्र कोणत्याही रुग्णालयात फरक पडला नाही. हा आजार त्यांना दहा वर्षापूर्वी एका अपघातात जडला होता. तेव्हापासून अमित उपचार घेत होते.

 

त्यांच्या पायाचे वजन सुमारे 50 किलोच्या आसपास झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करण्याचे थांबवले. मात्र नंतर त्यांनी एक शेवटचा पर्याय म्हणून मॅक्स हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी सुमारे 18 शस्त्रक्रिया केल्या. अखेर डॉक्टरांना यश आल्याचे मानलं जात आहे.

 

या आजाराच्या वेदना देखील भयानक होत्या. पायाने चालता येत नसल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. आणि यामुळे त्यांच्यावर उपास मारिची वेळ आल्याचे देखील शर्मा यांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या यशस्वी प्रयोगानंतर आत्ता त्यांचा पाय 25 किलोचा झाला आहे.

 

हा प्रसंग पाहून अनेकदा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहायला मिळाले. शर्मा कुटुंब देखील फार अडचणीत सापडले होते. मात्र हळूहळू हा धूर्धर आजार बरा होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button