मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानने दिली ‘गुड न्यूज

मुंबई | सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने शेअर केलेली गोड बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच काहींना काही कारणामुळे चर्चेत येत असते. तसेच सोशल मीडियावरही ती प्रचंड ऍक्टिव्ह असते.
ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच काहींना काही शेअर करत असते तसेच ती तिच्या खासगी आयुष्यातीलही काही गोष्टी आपल्या चाहत्यांनं सोबत शेअर करत असते. आता तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे.
यापूर्वी देखील तिने वैभव सोबत झी युवा वाहिनीवरील एका मालिकेमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर एक जाहिरात देखील त्यांनी एकत्रित केली होती. परंतु ही जोड आता पुन्हा एकदा एका चित्रपटात सर्वांना दिसणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने झी मराठी वरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रत्येक घराघरात पोहोचली.
या मालिकेतून तेजश्रीने आपल्यला अभिनयातून प्रेक्षकांना आपलेसे केले, या मालिकेत तेजश्रीने जान्हवीची जबरदस्त भूमिका साकारली होती. मालिकेच्या आधी तेजश्री प्रधान हिने ‘झेंडा’ या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने संतोष जुवेकरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याआधी तेजश्री प्रधान हिने मॉडलिंग देखील केले आहे.
तसेच काही दिवसापूर्वी बंद झालेली झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका अग बाई सासूबाई हि मालिकाही अतिशय गाजली होती यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधानाने शुभ्राचीजबरदस्त भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांचा देखील दमावेश होता. दरम्यान तेजश्रीने हि गुडन्यूज शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिला पुढील वाटचालीसाठीं शुभेच्छा दिल्या आहेत तसेच तेजश्रीला अनेकांनी अभिनंदनही केले आहे.