अभिनेत्री मिथिलावर मोठा दुःखाचा डोंगर; तिच्या पहिल्या प्रेमाच्या व्यक्तीचं निधन

मुंबई | आपल्या अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणारी मिथिला पालकर सध्या अत्यंत दुःखात सापडली आहे. कारण तिच्या आयुष्यात तिचं पहिलं प्रेम आणि तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

 

मिथिला ही स्वज्वळतेमुळे आणि हसऱ्या निरागस चेहऱ्यामुळे प्रेक्षक वर्गाला चांगलीच आवडते. तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम पाहिले आहे. तिचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

 

मात्र लाखोंच्या मनावर राज्य करणारी मिथिला आज खूप मोठ्या संकटात अडकल्याचे दिसत आहे. ती ज्यांच्या जवळ मोठी झाली त्यांनी तिला शिकविले अशा तिच्या आजोबांचे म्हणजेच भाऊंच निधन झाले आहे.

 

26 मार्च रोजी मिथिलाच्या आजोबांचे निधन झाले आहे. त्यानंतर आज तिने तिच्या Instagram खात्यावर एक पोस्ट लिहली आहे. त्यात ती भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले. मिथिला हिने तिच्या आजोबांना माझे पहिलं प्रेम तुम्ही आहात अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मिथिला दादरमध्ये खूप काळ तिच्या आजी आणि आजोबांकडे राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत तिचे घट्ट संबंध बनले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button