दिग्गज निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या गाडीला भीषण अपघात

मुंबई | धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत.
धर्मवीर हा चित्रपट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी मंगेश देसाई व्यस्त होते. त्यानंतर ते कुटुंबाच्या समवेत बाहेर फिरण्यासाठी गेले असता. हा अपघात झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मंगेश देसाई यांच्या संकल्पनेतून आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट बनविण्यात आला होता. हा चित्रपट प्रेक्षणाकानी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि हा चित्रपट अनेक दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला आहे.
अनेक कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अनेक दिवसांनी निर्माते मंगेश देसाई हे त्यांच्या कुटुंबाच्या समवेत फिरण्यासाठी मुंबई ते कर्जत रोड वरून चालले असता. त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
हा अपघात भीषण असल्याचे दिसत आहे. मात्र ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. तसेच घाबरण्याचे कारण नसून मी सुखरूप आहे. अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.