आत्ताच्या घडामोडी

दिपुचा झाला मोठा अपघात; रसिकांमध्ये चिंतेचे वातावरण

पुणे | गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर झळकत असलेली मालिका “मन उडू उडू झालं” तुम्हाला माहित असेल, या मालिकेने आपला प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. काही दिवसापूर्वी ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल स्थानी होती.

 

सध्या या मालिकेला एक वेगळं वळण लागलं आहे. या मालिकेतील सानिका गरोदर नाही, हे दिपू ला समजले, त्यानंतर दिपूने ही बातमी थेट तिच्या घरातील सदस्यांना सांगितली. त्यामुळे सानिका दिपुवर भडकली आणि तेथून निघून गेली.

 

सानिका निघून गेल्यावर तिला परत आणण्यासाठी दिपू गेली, मात्र गेल्यावर त्यांच्यात वाद झाला. सानिकाने दिपुला हात धरून घराच्या बाहेर काढले, आणि जोरात धक्का दिला. त्यानंतर रस्त्यावरून भरघाव वेगाने जात असलेला टेम्पोची दीपुला जोरदार धडक लागली.

 

आणि दिपूचा अपघात झाला आहे. त्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण लागले आहे. दिपू चा जीव सानिका मुळे धोक्यात आल्याचे दिसत आहे. दिपूच्या अपघातानंतर ती वाचणार का? असा प्रश्न रसिक वर्गाला पडला आहे.

 

“मन उडू उडू झालं” ही मालिका दररोज वेग वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. दररोज या मालिकेत गांभीर्य वाढत आहे. त्यामुळे मोठा रसिक वर्ग या मालिकेचा होऊ लागला आहे. येत्या काळात देखील ही मालिका वेगळ्या वळणावर जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button