बॉलीवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेनं सुशांत सिंगची आठवण

मुंबई | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर येतात. नैराश्य आणि अपयशाला कंटाळून अनेक जण आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. असाच निर्णय आणखीन एका अभिनेत्याने घेतला आहे.

 

मल्याळम सिने विश्वातील प्रसिद्ध अभिनेता एनडी प्रसादचा मृत्यू झाला आहे. रविवारी त्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

Advertisement

 

प्रसाद हा ४३ वर्षांचा होता. त्याने २६ जून रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घराबाहेर असलेल्या झाडाला फाशी घेतली आहे. त्याच्या पश्चात आता त्याची दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.

Advertisement

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो खूप मानसिक तणावात जगत होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावं. त्याची आणि त्याच्या पत्नीची सतत भांडणे होत होती.

 

तसेच अनेक वेळा त्याने जेलची हवा देखील खाल्ली आहे. अमली पदार्थ प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. साल २०२१ मध्ये त्याच्याकडे २.५ ग्राम हाशिष ऑइल आणि १५ ग्राम गांजा सापडला होता.

 

तो नेहमी नशेमध्ये असायचा. मात्र त्याने आजवर मल्याळम सिनेसृष्टीत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा निधनाने त्याचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *