आत्ताच्या घडामोडी

धोनीचा IPL ला कायमचा रामराम? पुढच्या वर्षी खेळणार का? यावर धोनीनं दिलं उत्तर

मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग या संघाचे नेतृत्व करत आहे. धोनीच्या बेस्ट कप्तानिमुळे चेन्नई हा संघ अनेकवेळा विजेता ठरला आहे. आयपीएल च्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे.

 

या संघाचे नेतृत्व पहिल्या पासून महेंद्रसिंग धोनीकडे आहे. चेन्नई सुपर किंग पेक्षा जास्त धोनीचा पर्सनल चाहता वर्ग आहे. धोनीचा चाहता वर्ग चांगला असल्यामुळे तो कायम आयपीएल च्या बाबतीत चर्चेत असतो.

 

सध्या देखील तो प्रचंड चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे तो 2023 मध्ये आयपीएल या लीगमध्ये खेळणार नाही. अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. होत असलेल्या चर्चेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

काल या वर्षातील चेन्नई सुपर किंग संघाचा शेवटाचा सामना होता. या आयपीएल मध्ये चेन्नई संघ प्लेऑफ मध्ये जाऊ शकला नाही. तसेच राजस्थान सोबत झालेल्या शेवटच्या सामन्यात देखील विशेष कामगिरी करू शकला नाही.

 

151 धावांचे आव्हान चेन्नई ने राजस्थान ला दिले होते. राजस्थान या संघाने 5 विकेट राखून हे आवाहन पेलून दाखविले, मात्र धोनीचां विशेष जलवा देखील या सामन्यात पाहायला मिळाला नाही. धोनीने 28 बॉल मध्ये 26 रण केले.

 

यात त्याने 1 सिक्स आणि 1 फोर मारला, धोनीची ही शेवटची मॅच असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र यावर खुद्द धोनीने उत्तर दिले आहे.

 

मॅच संपल्यावर बोलताना धोनी म्हणाला की, हे माझं शेवटचं वर्ष आहे की नाही हा एक मोठा प्रश्न नाही. कारण तुम्हाला माहित आहे की, आपण दोन वर्षांनंतर काहीही सांगू शकत नाही. पण पुढच्या वर्षी जोरदार पुनरागमन करण्यासाठी मी नक्कीच मेहनत करेन. असे धोनी म्हणाला त्यामुळे त्याच्या शेवटच्या सामन्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button