आत्ताच्या घडामोडी

महाराष्ट्राची हास्य जत्रा होणार बंद; चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | आपल्या टेन्शन वरची मात्रा दूर करणारी महाराष्ट्राची हास्य जत्रा आता बंद होणार आहे. सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम अनेकांसाठी हास्याची एक थेरपी बनलेला आहे.

 

आजवर या शो मधील सर्वच विनोद विरांनी आपल्याला खदखदून हसवलं आहे. साई आणि प्रसाद हे दोघे नेहमीच आपल्याला हास्य महारासिकांच्या भूमिकेत दिसलेत. अशात आता हा शो बंद होणार असल्याने चाहते नाराज आहेत.

 

सचिन मोटे यांनी माध्यमांशी बोलताना हा शो बंद का होणार आहे याचं कारण सांगितलं आहे. ते म्हणालेत की, ” गेली साडेतीन ते चार वर्षे आम्ही इथे काम करत आहोत. मात्र आता आम्हाला थोड रिफ्रेश होन गरजेचं आहे. सतत सतत त्याच त्याच गोष्टी वाढत आहेत.

 

त्यामुळे यामध्ये थोडं वेगळेपण आणणं गरजेचं आहे. आम्ही एवढ्या दिवसांपासून हा शो करत आहोत. यामध्ये आम्ही वेगवेगळी पात्र देखील आणली मात्र आता अजून काहीतरी नवीन घेऊन येण्यासाठी आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी आम्ही थोडे दिवस दूर चाललो आहोत.”

 

महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील सर्वच विनोदी कलाकारांनी आजवर संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. अशात आता पुन्हा एकदा नव्या जोमाने परतण्यासाठी त्यांनी हा ब्रेक घेतला आहे.

 

या शोमध्ये प्रसाद आणि नमाची जोडी नेहमीच वरचड ठरली आहे. त्यातही प्रत्येक स्किटमध्ये प्रसाद पेक्षा नमा दमदार अभिनयाने सर्वांना हसवते. तिचं लॉली हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडतं.

 

ओमकार भोजने आणि गौरव मोरे हे दोन्ही कलाकार देखील उत्तम आहेत. ओमकार आणि वनिता या दोघांचं मामा मामीच स्किट आजही लोक आवडीने पुन्हा पुन्हा पाहतात. या शोने आजवर रसिक प्रेक्षकांची अविरतपणे सेवा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button