‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधील हा कलाकार जगतोय खुपचं हालाकीचं जीवन; राहतोय चाळीत…

मुंबई | आपल्याला जे आवडतं तेच करून त्याचं क्षेत्रात पोट भरणार असं ठवणारे खूप कमी आहेत. अनेक जण पैशांच्या अभावी आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. मात्र या सर्व गोष्टींना मात देत महाराष्ट्राची हास्य जत्रेतला एक कलाकार आज घराघरात पोहचला आहे. मात्र अजूनही तो त्याच्या चाळीतल्या घरातच राहतो.

 

निखिल बने हा अजूनही चाळीत राहतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात तो अनेकदा विनोद करताना दिसला. आपण लहानणापासून ज्या ठिकाणी राहिलेलो असतो त्या ठिकाणी आपल्या अनेक आठवणी असतात.

 

ती जागा ते घर ते ठिकाण आपल्याला आपलस करून घेतं. त्यामुळे आपण कितीही मोठे झालो तरी देखील ती जागा सोडाविशी वाटत नाही. असाच प्रकार निखिल बने बरोबर देखील होत आहे.

 

त्यामुळे त्याने आपलं राहत घर न सोडता तेच घर पुन्हा एकदा नव्याने दुरुस्त केलं आहे. त्याच्या नवीन आणि जुन्या घराचा एक व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये त्याचं आधीचं घर तसेच ते घर दुरुस्त करत असतानाचे काही फोटो या मध्ये आहेत. हा व्हडिओ पोस्ट करत त्याने लिहिलं आहे की, ” जुन्या जागेत एक आत्मा असतो. त्यामुळे ती जागा कधीच सोडावी वाटत नाही.”

 

यासह त्याने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही जण मिळून त्याच्या घरी कपाट आनत आहेत. त्यामुळे त्याने कॅप्शनमध्ये आपल्या चाळीतल्या लोकांचे आभार मानत कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे की, ” आनंद असो नाही तर दुःख चाळीतली मानस नेहमीच सोबत असतात.”

 

निखिल बने हा भांडुप येथे राहतो. येथेच त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आहे. लहापणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक एकांकिका देखील केल्या आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून त्याला विशेष पसंती मिळाली. तसेच त्याच्या करिअरला कलाटणी देणारा हा शो ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button