आत्ताच्या घडामोडी

लता दीदी या बनारसी व्यक्तीला मानत होत्या मुलगा, मृत्यूपूर्वी एवढी संपत्ती केली नावावर

मुंबई | जगप्रसिध्द कोकिळा लता मंगेशकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण विश्वात शोककळा पसरली होती. लता मंगेशकर यांनी मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली होती. त्यांची शेकडो गाणी अमर झाली आहेत.

 

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. लता दीदी यांना मानणारा वर्ग मोठा होता. त्यांचे चाहते अफलातून होते. दिदीसाठी काय पण अशे म्हणणारे खूप होते.

 

त्यातीलच एक त्यांचे चाहते ते म्हणजे अरमान आणि रिझवान, हे दोघे बनारस येथील रहिवासी होते. आणि त्यांचा कापड उद्योग होता. लता दीदी त्यांच्या आयुष्यातील दररोज लागणाऱ्या अनेक गोष्टींपैकी बनारस साडीला अधिक महत्त्व देत होत्या.

 

सुरुवातीच्या काळात लता मंगेशकर या अरमान यांच्याकडून साडी खरेदी करू लागल्या, त्यानंतर लता दीदी आणि अरमान आणि रिझवान यांच्यामध्ये घरगुती नात निर्माण झालं. त्यानंतर हे दोन्ही भाऊ लता दीदींना आई मानू लागलं.

 

लता दीदी आणि या दोघांमध्ये रक्ताच्या रक्ताच्या नात्या प्रमाणे संबंध वाढले. सांगितले जाते की लता मंगेशकर यांनी त्यांच्या मृत्युच्या काही महिने अगोदर या दोघा भावांना काही चेक व्दारे पैसे दिले आहेत. मात्र या दोन्ही भावांनी लता मंगेशकर यांनी दिलेले चेक लमिनेशन करून ठेवले आहेत.

 

कारण लता मंगेशकर यांच्या त्यांची अफाट श्रद्धा होती. सख्या आई प्रमाणे ते लता मंगेशकर यांच्या सोबत राहत होते. लता दीदी यांचे निधन झाल्यावर अरमान आणि रिझवान हे दोघे फारच दुःखात पडल्याचे सांगितले जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button