आत्ताच्या घडामोडी

केकेला त्याच्या मृत्यूची आधीच लागली होती चाहूल? ‘कल हम रहे न रहे’ गाणं ठरलं शेवटच

दिल्ली | प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याचं काल (मंगळवारी) हृदयविकराच्या झटक्यानं निधन झालं. हृदविकाराचा झटका येण्याआधी त्याने कोलकत्ता येथील एका कॉलेजमध्ये लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम केला होता.

 

आपल्या कॉलेजमध्ये एवढा मोठा गायक येणार आणि गाणं गणार म्हणून सर्वच विद्यार्थी खूप खुश होते. लाईव्ह कर्यकम छान पद्धतीने झाला देखील पण नंतर अचन त्याच्या निधनाची बातमी समोर आली. यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाण्याने डबडबले.

केकेचं वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी रात्री त्याला हृदयिकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत रात्री १०.४५ च्या सुमारास त्याने या जगाचा निरोप घेतला. खरंतर केके कोलकत्तामधील गुरुदास या कॉलेजमध्ये लाईव्ह गात होता तेव्हाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे तो आपल्या हॉटेलमधील रुमवर परतला. तिथे आल्या नंतर त्याच्या छातीत खूप दुखू लागले.

 

तेथील व्यक्तींनी तातडीने त्याला कोलकत्ताच्या सीएमआरआय या रुग्णालयात दाखल केलं. मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड असल्याचं सांगितलं. म्हणजे रुग्णालयात येण्या आधीच त्याचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टर म्हणाले. कॉलेजमध्ये गाणं गात असताना अनेकांनी त्याच्या गाण्याचा व्हिडिओ काढला होता. सध्या त्याच्या गाण्याचे शेवटचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

 

कॉलेजने देखील त्यांच्या फेसबुक पेजवर त्याच्या शेवाच्या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो जे गाणं गात आहे त्यावरून त्याला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्हिडिओमध्ये तो ” कल हम रहे न रहे कल, याद आयेगे ये पल….” हे गाणं गातं आहे. त्याच्या गाण्याचा हा शेवटचा व्हिडीओ पाहून सर्वच चाहते चकित झाले आहेत. मृत्यू आधीच त्याच हे गाणं अनेकांच्या काळात घर करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button