आत्ताच्या घडामोडी

Kk Death | केके सोडून गेलाय करोडोंची संपत्ती; एका गाण्यासाठी घ्यायचा एवढे पैसे

दिल्ली | KK च्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरून न निघणारी एक पोकळी तयार झाली आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे चाहते आणि बॉलिवूड कलाकार शोक व्यक्त करत आहेत. अशात केकेने आपल्या गाण्यातून बक्कळ संपत्ती कमावली होती. या बातमीतून त्याच्या संपत्ती विषयी जाणून घेऊ.

 

नव्वदच्या दशकात केकेन आपल्या आवाजाने सर्वांनाचं भुरळ घातली होती. त्याच्या एका गाण्यासाठी तो तब्बल ७ ते ८ लाख रुपये मानधन घेत होता. तसेच लाईव्ह शोसाठी तो १५ ते २५ लाख रुपये घेत असे. केकेची नेटवर्थ इनकम १.५ मिलियन डॉलर म्हणजे ११ कोटी रुपयांच्या आसपास होती.

 

केकेने कायमच आरामदायी आणि आलिशान आयुष्य जगल आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. ज्यामध्ये ऑडी, बीएमडब्लू सारख्या गाड्यांचा जास्त समावेश आहे. तसेच मुंबई आणि बँगलोर येथे देखील त्याची बरीच संपत्ती होती. त्याच्या संपत्तीची किंमत काढली तर जवळपास ८० ते ९० कोटींच्या संपत्तीचा तो मालक होता.

 

अशात गाण्या बरोबरच त्याला घोडेस्वारीची देखील आवड होती. त्यामुळे त्याने काही घोडे देखील खरेदी केले होते. केके मनाने आणि संपत्ती दोन्हीं बाबींमध्ये भरपूर श्रीमंत होता. त्याच्या पश्चात आता त्याची पत्नी ज्योती कृष्णा आणि दोन मुलं आहेत.

 

त्याने साल १९९१ मध्ये ज्योती बरोबर लग्न केलं. ज्योती ही त्याची लहानपणापासूनची मैत्रीण होती. केकेचा मुलगा नकुलला देखील संगीताची आवड आहे. त्याच्या मुलीचं नाव तमारा असं आहे. केकेने बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनेक जिंगल्स गायल्या होत्या.

 

तडप तडप के, अजबसी, तूही मेरी शब है, मौसम मौसम था सुहाना बडा…, अशी तब्बल २५०० गाणी त्याने आपल्या आवाजाने सुपरहिट ठरवलीत. त्याच्या निधना नंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

 

तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याला ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. काही वेळा पूर्वी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक कलाकार तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button