जी होती मनात तीच आणली घरात, या म्हणी प्रमाणे आहे केकेची प्रेम कहाणी; पाहा केकेच्या पत्नीचे फोटो

दिल्ली | दस बहाने, तूही मेरी शब है, खुदा जाने अशा अनेक हिट गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके आज आपल्यामध्ये नाही. हम रहे या ना रहे कल, कल याद आयेंगे ये पल…. त्याच्या या गाण्यानं आज सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणल आहे.

 

केकेने बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली जी मोठी हिट देखील झाली. मात्र बॉलिवूडच्या लाईमलाईट पासून तो नेहमीच दूर राहिला. केके अगदी साधा सरळ स्वभावाचा होता. एवढ्या चांगल्या व्यक्तीचा इतक्या लवकर आणि अशा प्रकारे मृत्यू होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. या बातमीतून त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

कृष्णकुमारने कायम बॉलिवूडच्या झगमग पासून स्वतः ला दूर ठेवलं होतं. एवढी प्रसिध्दी मिळूनही त्याने कधीच याचा चुकीचा किंवा कुणाला त्रास होईल असा वापर केला नाही. आज काल अनेक प्रसिद्ध कलाकार आणि अन्य व्यक्ती देखील थोडी प्रसिध्दी मिळाली की, लगेच त्याच्या डोक्यात हवा जाते. मात्र केके अशा व्यक्तींपैकी नव्हता. त्याला कोणत्याच गोष्टीचं व्यसन नव्हतं.

 

त्याने कधीच दारू आणि सिगारेट सारख्या गोष्टीची सवय लावून घेतली नाही. एवढंच नाही तर बालपणापासून तो ज्या मुलीवर प्रेम करत होता. तिच्याशीच त्याने लग्न केलं. ज्योती असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. लहान असताना पासून त्याला ती आवडायची. त्यामुळे पुढे साल १९९१ मध्ये त्या दोघांनी विवाह केला.

 

आपल्या पत्नी बरोबर तो खूप सुखी संसार करत होता. त्याला दोन मुलं देखील आहेत. मुलगा नकुल हा देखील गायक आहे. आणि मुलगी तमारा ही तीच शिक्षण पूर्ण करत आहे. २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्ली येथे त्याचा जन्म झाला. त्याचं बालपण देखील दिल्लीमध्ये गेलं. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर किरोरी माल कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

 

त्यानंतर त्याने एका कंपनीत मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून देखील काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने ३,५०० जिंगल्स गायल्या होत्या. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या समर्थनासाठी त्यांन “जोश ऑफ इंडिया” हे गाणं गायल होत.

 

लेसले लेविस यांना तो आपले संगीताचे गुरू मनायचा. संजय लीला भन्साळी यांच्या “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटातील तडप तडप हे त्याचं बॉलिवूडमधील पहिलं गाणं होतं. आता पर्यंत त्याच्या नवी संगीतातील १६ पुरस्कार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button