करणने गुपचूप उरकलं लग्न; फोटो व्हायरल झाल्यावर चाहत्यांना बसला धक्का

दिल्ली | हिंदी टिव्ही सिरियलचा प्रसिद्ध अभिनेता करण व्ही ग्रोवर काल (३१ मे) रोजी लग्नबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड पॉपी जब्बल बरोबर त्याने लग्न केलं आहे. हे दोघे गेल्या १० वर्षांपासून एक मेकांना डेट करत होते. अशात आता आपल्या प्रेमाच्या नात्याला त्यांनी मंगळवारी पती पत्नीचं नातं जोडलं आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या लग्न सोहळ्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

 

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघेही आपल्या लग्नात खूप खुश आहेत. लग्नासाठी करणने पांढऱ्या रंगाचा कुरता आणि पायजमा घातला आहे आणि डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा बांधला आहे. लग्नासाठी केलेला त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतोय. अशात त्याची पत्नी पॉपीने देखील पांढऱ्या रंगाचा एक सुंदर डायमंडने भरलेला घागरा घातला आहे.

 

आपला लग्नाचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात पोपटी रंगाचा चोकर, नाकात मोठी नथ आणि भाळी कुंदन असलेली मोत्यांची बिंदी लावली आहे. पॉपी देखील लग्नाच्या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

 

या दोघांनी आपलं लग्न कमी लोकांमध्येच पार पाडलं आहे. त्यांच्या लग्नाला मित्र परिवारातील शमा सिकंदर, सोनाली सहगल आणि लक्ष्मी राय हे कलाकार उपस्थित होते. करण आणि पॉपी हे दोघे पहिल्यांदा कार पार्किंगमध्ये एकमेकांना भेटले होते. इथेच त्यांच्यात मैत्री झाली. आणि या मैत्रीला नंतर प्रेमाचं नाव मिळालं.

 

या लवबर्डने आता हेच प्रेम साथ फेरे घेऊन आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हाती घेतला आहे. सोशल मीडियावर या दोघांना त्यांच्या लग्नासाठी अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. अनेक जण त्यांना हार्ट ईमोजी देखील शेअर करत आहेत. आपल्या फेवरेट जोडीचे लग्न झाल्याने चाहते देखील खूप खुश आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button