‘कॉपी विथ करण’ च्या एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो इतके कोटी; संपत्ती पाहून धक्काच बसेल

दिल्ली | बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला कोणत्याही विशेष ओळखायची गरज नाही. सध्या बॉलिवूडवर त्याचेच राज्य सुरू आहे. करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत करण जोहरचे देखील करिअर चमकले.

 

त्यानंतर करण जोहरने एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. कारण हा धर्मा प्रॉडक्शनचा मालक आहे. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. करण त्यांच्या चित्रपटांबरोबरच कॉफी विथ करण या शो मुळे देखील नेहमी प्रसिध्दी झोतात आणि लाईमलाईटमध्ये राहतो.

 

करण जोहरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्याला स्टार किड्सचे गॉड फादर असेही म्हटले जाऊ शकते. करण जोहरने इंडस्ट्रीत अनेक स्टार किड्स लाँच केले. सध्या करण जोहर हा बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत निर्माता दिग्दर्शक आहे आणि तो खूप लक्झरी आयुष्य जगतो. त्याचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही आणि त्याचे छंदही खूप मोठे आहेत.

 

करण जोहरचा जन्म २५ मे १९७२ रोजी मुंबईत झाला. त्याचे वडील यश जोहर हे हिंदी चित्रपट उद्योगातील निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक होते. करण जोहरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात दिग्दर्शक म्हणून केली होती, परंतु नंतर तो इतर अनेक व्यवसायांमध्येही सामील झाला.

 

गेल्या काही वर्षांपासून तो अभिनय, वेशभूषा डिझाइनिंग, पटकथा लेखक, टेलिव्हिजन होस्ट, अनेक रिअॅलिटी शोजचे जज आणि इंडस्ट्रीतील अनेक तरुण प्रतिमांचा मार्गदर्शक अशा भूमिकेत दिसला आहे. या सगळ्यातून करण मोठा पैसा कमावतो. त्याची नेटवर्थ देखील भारतातील टॉप फिल्ममेकर्ससारखीच आहे. मात्र त्याने अजून लग्न केले नाही.

 

करणच्या स्थावर जंगम संपत्ती विषयी सांगायचं झाल्यास मुंबईच्या कार्टर रोडवर असलेल्या डुप्लेक्स मॅन्शनमध्ये त्याचा समुद्राभिमुख फ्लॅट आहे. हे घर करणने २०१० मध्ये विकत घेतले होते. हा फ्लॅट 8000 स्क्वेअर फूटसाठी त्याला किमान 40000 स्क्वेअर फूट खर्च करावा लागला.

 

हे घर त्याने तब्बल 32 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. याशिवाय त्यांचे मुंबईतील मलबार हिल्समध्ये आणखी एक आलिशान घर आहे, या घराची किंमत 20 कोटी रुपये आहे. करणच्या घराचे इंटीरियर शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या कंपनीने केले आहे.

 

आलिशान घरात करोडोंच्या गाड्या पार्क केल्या आहेत. त्यांच्याकडे साडेसात ते आठ कोटींची वाहने आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये BMW 745, BMW 760, Mercedes S Class सारख्या वाहनांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button