आत्ताच्या घडामोडी

शेकडो चित्रपटात सोबत काम करून देखील कादर खान यांच्या मृत्यूवेळी गोविंदाने साधा फोनही केला नाही; कारण पाहून धक्का बसेल

दिल्ली | गोविंदाच्या डान्सचे आणि त्याच्या विनोदाचे आजही अनेक चाहते आहेत. गोविंदाने नव्वदच्या दशकात बॉलिवूड चांगलचं गाजवलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

 

मात्र बॉलिवूडमधील त्याची ही सफलता तितकीशी सोपी नव्हती. कारण ज्यावेळी त्याची एन्ट्री होत होती त्याच वेळी बॉलिवूडचे तिन्ही खान टॉप लेवलला चालले होते. त्यामुळे सुरुवातीला गोविंदा बॉलिवूडमध्ये टिकेल की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता.

 

मात्र गोविंदाने आय एम अ स्ट्रीट डान्सर म्हणत सर्वांवरच जादू केली. बॉलिवूडला त्याने अनेक यशस्वी चित्रपट दिले. यावेळी त्याने रविना टंडन, निलम आणि करिश्मा कपूर या तिन्ही आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर स्क्रीन शेअर केली.

 

या अभिनेत्रींनबरोबर त्याची जोडी खूप सुंदर दिसायची. करिष्मा कपूर आणि गोविंदा या दोघांचे अनेक हिट चित्रपट आहेत जे आजही चाहते आवडीने पाहतात. अशात अभिनेत्रींबरोबरच त्याची जोडी बॉलिवूडच्या आणखीन एका दिग्गज कलाकारा बरोबर खूप शोभून दिसायची.

 

हे दिग्गज कलाकार दुसरे तिसरे कुणी नसून कादर खान आहेत. बाप लेकाची भूमिका असो अथवा जावई आणि सासऱ्याची कोणत्या ना कोणत्या नात्याचा वापर करत ही जोडी बहुतेक चीत्रपटात एकत्र पाहायला मिळायची.

 

या जोडीने देखील प्रेक्षकांना खळखळवून हसवत प्रेक्षकांच मनोरंजन केलं. मात्र एक दिवस असं काही घडल की, या दोघांची जोडीला कुणाचीतरी नजरच लागली असावी. दोघेही एका प्रसंगानंतर एकमेकांशी बोलत नव्हते. एवढेच नाही तर गोविंदाने कादर खान यांच्या मृत्यू आधी शेवटच्या क्षणी त्यांना एक कॉल सुद्धा केला नाही.

 

गोविंदा कादर खान यांना आपले वडील आणि गुरू म्हनायचा. कारण कादर खान हे एक उत्तम कलाकार तर होतेच पण ते उत्तम लेखक देखील होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी डायलॉग लिहिले आहेत. अशात गोविंदाच्या बहुसंख्य हिट चित्रपटांमध्ये त्यांनी स्टोरी आणि डायलॉग लिहिले आहेत. यासह त्यांनी अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांसाठी देखील डायलॉग आणि स्क्रीन प्ले हीलीलेत. त्यामुळेच गोविंदा त्यांना गुरू मानायचा.

 

अशात एक दिवस कादर खान एका दैवी विषयावर पुस्तक लिहीत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर एक बिकट परिस्थिती असल्याने ते थोड्या वेगळ्या अवस्थेत होते. ज्या अवस्थेत पुस्तक लिहिताना नसायला पाहिजे. यावेळी गोविंदाने त्यांना हे पुस्तक न लिहिण्याचा सल्ला दिला.

 

गोविंदा खूप धार्मिक आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर त्याचा खूप विश्वास आहे. अशात गोविंदाने त्यांना हे पुस्तक न लिहिण्याचा सल्ला दिल्याने कादर खान यांना गोविंदाचा खूप राग आला होता. त्यामुळे हे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते.

 

कादर खान खूप रागावले होते. त्यामुळे ते गोविंदाला खूप ओरडले देखील. त्यामुळे नंतर गोविंदाला देखील त्यांचा खूप राग आला. कारण ओरडत असताना कादर खान यांनी गोविदासाठी बरेच चुकीचे शब्द उच्चारले होते.

 

या सर्व भांडणांनंतर गोविंदा यांनी कादर खान यांच्याशी बोलायचे ठरवले तेव्हा त्यांनी त्याच काहीच ऐकून घेतलं नाई. ते कधीच त्याच्याशी बोलले नाहीत. एवढंच नाही तर गोविंदाने कादर खान यांचा मृत्यू झाला तेव्हा एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्याने कादर खान यांना फादर फिगर असं म्हटलं होतं.

 

यावर कादर खान यांच्या मुलाने रिप्लाय देखील केला होता. तो असं म्हणाला होता की, ” जेव्हा तुमचे फादर फिगर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा तुम्ही त्यांच्या चौकशीसाठी एक फोन सुद्धा का केला नाही. ” त्यानंतर अनेक मुलाखतीमध्ये गोविंदाला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने आमचं नात त्या मुलाला समजणार नाही असं उत्तर दिलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button