आत्ताच्या घडामोडी

रस्त्यावर फिरून पेन विकायचे जॉनी लिवर; मात्र ‘त्या’ घटनेनं त्यांचं आयुष्यचं बदलून गेलं

मुंबई | कॉमेडी म्हणलं की पहिलं नाव निघत ते म्हणजे जॉनी लीवर, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून झी मराठी वरील पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.

 

ते एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. मराठी पेक्षा जास्त त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांची कॉमेडी अनेकांना भावते.

 

मात्र त्यांच्या लहान पणीच्या आयुष्यातील काही गोष्टी कोणाला माहीत नाहीत. एका कार्यक्रमात त्यांनी या बाबत माहिती दिली आहे. जॉनी यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांना मजूरी करावी लागत असे.

 

तसेच उपजीविका भागवण्यासाठी त्यांना रस्त्यावर पेन विकावे लागले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्ष खूप स्ट्रगल केलं आहे. त्यांनी ज्या चित्रपटात भूमिका साकारली आहे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो, हे निश्चित आहे.

 

लहान पणी ते ज्यावेळी पेन विकत होते त्यावेळी त्याठिकाणी त्यांचे पेन कोणी घेत नव्हते. त्यामुळे बड्या अभिनेत्यांची मिमिक्री करून त्यांनी पेन विकण्यास सुरुवात केली. मात्र हे शासकीय अधिकाऱ्यांना आवडलं नाही.

 

त्यामुळे त्यांनी सर्व पेन घेऊन जप्त केले आणि सांगितले, मिमिक्री करायची असेल तर मागील सभागृहात कर, ही गोष्ट जॉनी यांनी अत्यंत मनावर घेतली आणि पुढील तीन वर्षात त्यांनी त्याच सभागृहात पहिला कार्यक्रम केला.

 

त्या कार्यक्रमात ते प्रकाश झोतात आले. आणि त्यानंतर त्यांना चित्रपटात काम मिळू लागले. सध्या त्यांनी 350 पेक्षा अधिक चित्रपटांत भूमिका साकारली आहे. सध्या ते चर्चेत आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button