आत्ताच्या घडामोडी

Video – त्याने फोटो काढला म्हणून जया बच्चन भलत्याच भडकल्या; व्हिडिओ पाहून धक्काच बसेल

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन या अतिशय कडक स्वभावाच्या महिला आहेत असं मानले जाते. त्यांना फोटो काढायला अजिबात आवडत नाही. त्या अनेकदा कॅमेरामॅन आणि चाहत्यांवर रागावताना दिसल्या आहेत. याच कारणामुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. नुकतेच पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळाले आहे.

 

यावेळी फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफर्सना माफी मागावी लागली. अलीकडेच जया बच्चन मुंबईतील एका ठिकाणी दिसल्या होत्या. त्या डेंटल क्लिनिकमध्ये पोहोचल्या. यादरम्यान, त्या तिथून बाहेर आल्यावर त्यांचे फोटो काढण्यास सर्वांनी सुरुवात केली. पण जया बच्चन यांचे असे फोटो काढणे त्यांना महागात पडेल हे त्यांना फारसे माहीत नव्हते.

 

फोटो काढल्याबद्दल जया बच्चनने त्यांना फटकारले. त्या उपस्थित व्यक्तीला खूप ओरडल्या. तसेच त्याला माफी देखील मागायला सांगितली. त्या एकाला ओरडत होत्या तरी दुसरा एक जण त्यांचे फोटो काढत होता. त्यामुळे जया यांचा पारा अधिकच चढला.

 

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीला फटकारताना जया बच्चन म्हणाल्या, ‘तुम्ही लोक इथेही पोहोचलात’. कुणाचेही फोटो त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय काढायचे नसतात एवढं सुधा तुम्हाला समजत नाही का?” असं त्या म्हणाल्या

एका शोमध्ये करण जोहरने श्वेता आणि अभिषेकला जया बच्चन यांच्या अशा वागण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांचे उत्तर धक्कादायक होते. दोघांनी सांगितले – ‘जया बच्चन क्लॉस्ट्रोफोबिक आहेत. ही अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये गर्दी पाहून अचानक माणूस अस्वस्थ होतो.

 

कधी कधी मलाही राग येतो. हे बाजारपेठेत, गर्दीच्या वाहनात किंवा लिफ्टमध्येही जाणवू शकते. त्यांना कोणी ढकलले किंवा स्पर्श केला हे त्यांना अजिबात आवडत नाही. याशिवाय कॅमेऱ्याचा फ्लॅश डोळ्यांवर पडल्यानेही त्यांना त्रास होतो.”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button