अभिनेत्री ईशा गुप्ता भडकली; ‘पुरुष जेव्हा स्वतःच्या शरीराचं….’ म्हणत व्यक्त केल्या भावना

मुंबई | एक स्त्री आणि तिचे कपडे, तिचं उठणं, बसणं या सर्वांवरून तिला जज केले जाते. मग अगदी लहान मुली पासून ते मोठ्या बाई पर्यंत स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून बंधने घातली जातात.
यात सर्व सामान्य मुलींपेक्षा या गोष्टीचा जास्त त्रास अभिनेत्रींना सहन करावा लागतो. प्रत्येकच कलाकाराला आपल्या कारकीर्दीत नेहमीच कौतुकासह ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
अशात अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये स्वखुशीने बोल्ड सीन देत असतात. यात त्यांना काहीचं वाटत नाही यासाठी त्यांची काहीच हरकत नसते. मग तरी देखील त्यांना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जातं. या सर्व प्रकारावर अभिनेत्री ईशा गुप्ताने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ती म्हणाली आहे की, ” एखाद्या स्त्री बरोबर कोणी छेडछाड केली तरी तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. चित्रपटात, बाहेरील जगात किंवा कोणत्याही ठिकाणी पुरुष जेव्हा स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन करतात तेव्हा त्यांना कोणीच काही बोलत नाही. पण स्त्रियांनी बोल्ड सीन्स दिले. हॉट फोटशूट केले तर तिला मात्र संस्कारांची परिभाषा शिकवली जाते.”
अभिनेत्रीने एका मुलाखतीत या मुद्द्यावर भाष्य केलेले आहे. तिच्या या वक्तव्याने अनेक जण तिचं कौतुक देखील करत आहेत. तसेच अनेक चाहते या मताला सहमती दर्शवत आहेत.
अभिनेत्री इशा गुप्ता ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती अनेकांच्या काळजावर वार करते. सध्या ती तिच्या ‘आश्रम ३’
या सिरीज मुळे खूप चर्चेत आली आहे.
तिने आजवर अनेक हॉट आणि बोल्ड सीन दिले आहेत. मात्र तिचा अभिनय देखील तितकाच दमदार आहे. साल २०१२ मध्ये आलेला ‘जन्नत २’ हा तिचा डेब्यू चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केले.
राज, चक्रव्यूह, गोरी तेरे प्यार में, हमशकल्स, बेबी, मे रहू या ना रहू अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट खूप गाजला होता.
या चित्रपटात इशाने प्रीती मखिजा हे पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं त्यावेळी मोठं कौतुक करण्यात आलं होतं. लवकरच अभिनेत्री ‘हेराफेरी ३’ मध्ये झळकणार आहे.