किर्तनकार इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले….

अहमदनगर | आपल्या कीर्तनातून करोडो तरुणांचे प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरिकर महाराज यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे 30मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांची वाईट संगत मोडली, दरूच्या व्यसनापासून तरुणांना लांब केलं. तसेच अनेक संसार त्यांनी त्यांच्या शब्दावर उभे केले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचं कीर्तन असते. या कीर्तनाला लाखोंच्या संख्येत नागरिक उपस्थित असतात.

 

मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना डॉक्टरांनी 30मे पर्यंत सक्तीची विश्रांती घ्यायला लावली आहे. त्यामुळे त्यांनी 30मे पर्यंत चे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी एक पत्र जारी केले आहे.

 

त्यात त्यांनी माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. एका लाकडाच्या ट्रॉलीला त्यांची स्कॉर्पिओ जाऊन धडकली होती.

 

यात त्यांच्या चालकाला लागले होते. मात्र महाराजांना दुखापत झाली नव्हती, त्यानंतर जवळच्या पोलिसांनी त्यांच्या चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच दुसऱ्या गाडीच्या साहाय्याने त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी पोहचविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button