बापरे! प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली खुपचं वाईट अवस्था: कारण पाहून धक्काच बसेल

दिल्ली | दातांच्या दुखण्याचा त्रास आजकाल अनेक जणांना सहन करावा लागतो. अशात अनेक व्यक्ती या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी दंत चिकित्सकांकडे जातात. तिथून उपचार घेऊन बरे देखील होतात. मात्र एका दंत चिकित्सकाच्या चुकीमुळे एका अभिनेत्रीला आपला सुंदर चेहरा गमवावा लागला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्वाती सतीशला गेल्या काही दिवसांपासून दातांच्या दुखण्याचा त्रास होत होता. एकदा दात दुखायला लागले की, डोकं, कान म्हणजेच दातांशी जोडलेले इतर अवयव देखील दुखतात. या वरती उपचार घेण्यासाठी ती एका डेंटिस्टकडे गेली.
डेंटिस्टकडे गेल्यानंतर तिला दात साफ करून त्यावर रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागेल असं सांगण्यात आलं. यावर तिने होकार कळवत ही ट्रीटमेंट सुरू केली. मात्र या ट्रीटमेंटमुळे दात नाही तर तिला तिचा चेहराच गमवावा लागला.
डेंटिस्टने केलेल्या ट्रीटमेंटमध्ये रूटकॅनल झाल्यानंतर अभिनेत्री घरी आली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर खूप सूज चढू लागली. तिने यावर आणखीन उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता दहा दिवस उलटूनही तिच्या चेहऱ्यावरची सूज कायम आहे.
तिच्या चेहर्यावर सूज आहे तसेच तिला असह्य वेदना देखील सहन कराव्या लागत आहेत. यासाठी तिने ज्या ठिकाणी रूट कॅनल केले होते त्या डेंटिस्टची पुन्हा एकदा भेट घेतली. यावर डेंटिस्टने तिला झालेल्या दुखापतीवर उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच यामध्ये आमची काही चूक नाही असे सांगत त्यांनी हात वर केले. अशात आता अभिनेत्री दुसऱ्या दंत चिकित्सकाकडे उपचार घेत आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती लवकरच आधीच्या दंतचिकित्सकावर गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहे.
स्वाती सतीश ही कन्नड चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री आहे. तिने कन्नड मधील छोट्या पडद्यावर देखील मोठी कामगिरी बजावली आहे. स्वाती दिसायला अतिशय सुंदर आणि देखणी आहे.
मात्र आता तिच्या चेहऱ्यावर सूज असलेला तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जर तिचा आधीचा फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, रूटकॅनलमुळे तिचे ओठ, नाक आणि गाल पूर्णपणे सुजलेले आहेत.
यामध्ये तिला होत असलेल्या वेदनांचा आपण विचारही करू शकत नाही. स्वातीचा नुकताच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशात तिच्या चेहर्याला झालेल्या दुखापतीमुळे आता ती सार्वजनिक ठिकाणी देखील जाऊ शकत नाही. यामुळे तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन चे काम देखील रखडले आहे. तसेच या सर्वांचा परिणाम तिच्या पुढील करिअरवर होऊ शकतो असं अनेक जण म्हणत आहेतं.