आत्ताच्या घडामोडी

देशातील सर्वाधिक शक्तिशाली महीला; डोक्यावर पदर आणि हातात बांगड्या पण कामं एवढं मेहनतीचं जे पुरुषांनाही लाजवेल!

दिल्ली | सध्याच्या घडीला असं कोणती क्षेत्र नाही जिथे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही. अगदी सर्वच क्षेत्रांची माहिती घेत अनेक स्त्रिया मोठ्या प्रगती पथावर पोहचल्या आहेत. कोणत्याच कामात महिला मागे राहिलेल्या नाहीत. मग ते ऑफिसमधील बुद्धीचे काम असो अथवा ट्रकचे टायर बदलायचे असो.

 

मोठ्या आणि श्रमिक कामात देखील महिला काम करत आहेत. आज या बातमीतून अशाच एका जिद्दी आणि मेहनती पहिली ट्रक मेकॅनिक महिला कोण आहे? आणि तिच्या आयुष्य याबद्दल जाणून घेणार आहोत. शांती देवी या ५५ वर्षीय महिला ट्रक रिपेअर करण्याचं काम करतात. त्या पहिल्याच अशा महिला आहेत ज्यांनी एवढं मेहनतीचं काम केलं आहे. शांती गेल्या २० वर्षांपासून एक ट्रक मेकॅनिक आहेत.

 

अगदी टायर बदलायचा असो अथवा ट्रकमधील एखादा पार्ट दुरुस्त करायचा असो. या सर्वच कामात त्यांचा हात खंडा आहे. गेल्या २० वर्षां पासून त्या दिल्लीतील संजय गांधी ट्रान्सपोर्ट डेपोमध्ये काम करतात. सातत्याने हे काम करत असल्याने त्या यामध्ये कुशल झाल्या आहेत. इथे रोजचे ४ हजार ट्रक रीपेरींग साठी येत असतात.

 

• शांती कशा बनल्या ट्रक मेकॅनिक –
शांती देवी यांना एकूण आठ मुलं आहेत. त्यांची दोन लग्न झाली आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्या सुरुवातीपासूनच बाहेर काम करायच्या. मात्र त्यांचा पहिला पती चांगला नव्हता. तो रोज दारू पिऊन शांती यांना त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला वैतागून त्यांनी दिल्ली गाठली आणि इथे गॅरेज बाहेर चहाचे छोटे दुकान सुरू केले.

 

त्यावेळी दुकान चालत तर होते मात्र पुरेसा पैसा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी समोरच असलेल्या गॅरेजमधून ट्रकचे काम शिकून घेतले. काही दिवसांनी त्यांच्या पहिला पतीचं निधन झालं. त्यामुळे पुढे दिल्लीचे रहिवासी रामबहुदार यांच्याशी शांती देविंनी विवाह केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button