बॉलिवुड हादरलं! लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन; घरात घुसून हत्या

दिल्ली | मनोरंजन विश्वासाठी आणखीन एक मोठी आणि दुःखद घटना समोर येत आहे. लोकप्रीय अभिनेत्री अमरीन भट्ट हिची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे.

 

अमरीन ही जम्मू काश्मीरमधील एक अभिनेत्री आहे. तिने आता पर्यंत अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. बुधवारी (१ जून) रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरात तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. बडगान जिल्ह्यातील चतुरा येथे ही अभिनेत्री राहते.

 

अभिनेत्री तिच्या लहान भाच्याबरोबर इथे राहत होती. रात्रीच्यावेळी आतंकवादी तिच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये जागीच अभिनेत्रीचा मृत्यू झाला. दरम्यान तिचा भाचा देखील यामध्ये जखमी झाला.

 

यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांनी दहशत वाद्यांना लवकरात लवकर पकडलं जाईल असं आश्वासन देखील दिलं.

 

अशात अभिनेत्रीच्या मृत्यू नंतर तिचे चाहते आणि कुटुंबीय तिच्या न्यायासाठी मागणी करत होते. अनेक जण तिच्या निधनामुळे दुःखी झाले मात्र या सर्वांना आतंकवाद्यां आणि विरोधात तितकाच राग ही अनावर झाला.

 

अशात जवानांनी या आतंवाद्यांचा शोध घेत त्यांचा खात्मा देखील केला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यू नंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण खूप तापलं होतं.

 

अमरीन ही ३५ वर्षांची होती. ती सुंदर गाणी देखील गायची तसेच तिचा अभिनय देखील दांडगा होता. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असायची आपल्या गाण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करायची.

 

ती एक हरहुन्नरी अभिनेत्री होती. त्यामुळेच सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते होते. त्यामुळे अनेक जणांनी तिच्या निधनानंतर आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. अशात ही संपूर्ण परिस्थीत आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पुढील ३३ तासांच्या आत अभिनेत्रीच्या मारेकऱ्यांचा खात्मा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button