आत्ताच्या घडामोडी

लग्नाच्या एका महिन्यानंतर हृता दुर्गुळेने दिली मोठी गुड न्यूज; वाचून तुम्हीही व्हाल खूप खुश

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतल एक प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आजवर आपल्या दिलखेच अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकतेच तिचे लग्न पार पडले. यावेळी लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

 

अभिनेत्री तिच्या अभिनयासह सोशल मीडिया पोस्टमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. लग्नातील तिच्या मेहंदीचे, हळदीचे आणि अनेक वेगवेगळ्या रीतींचे फोटो सोशल मीडियावर आपण सर्वांनी पाहिले. अशात ती जेव्हा तिचा पती प्रतीक शहा बरोबर हनिमूनला गेली होती तेव्हा देखील ती खूप चर्चेत होती. अनेकांनी तिच्या लग्नातील सुंदर कपडे, दागिने यांपासून ते लग्नातील जेवणा पर्यंत चर्चा केली.

 

यामध्ये अगदी तिच्या मन उडू उडू झालं या मालिकेतील कलाकारांवरून देखील चांगलीच चर्चा रंगली होती. मालिकेत तिचा सह लकाकर म्हणून अभिनेता अजिंक्य राऊत इंद्राच्या भूमिकेत दिसतो. इंद्रा आणि दिपू या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

 

अशात हृताच्या लग्नाला अजिंक्य आला नसल्याने अनेक जण त्याला वेगवेगळे प्रश्न विचारू लागले. तो नाराज आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर त्याने स्वतः स्पष्टीकरण देत सांगितलं की, ” माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस त्याचं दिवशी होता त्यामुळे मी हृताच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. तिच्या सासू बईंशी यावर माझं बोलण झालं होतं.”

 

लग्न नंतर काही दिवसांनी ती मन उडू उडू झालं या मालिकेत दिसणार नाही. तिने ही मालिका सोडली आहे. अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र तसं काही नसून ती पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर दिसली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग आता सुखावला आहे. अशात अभिनेत्रीने यासह चाहत्यांना आणखीन एक सुखद बातमी दिली आहे.

 

ती म्हणजे पुढील काही दिवसांतच ती दोन नवीन आगामी चित्रपट घेऊन तीच्याच्या भेटीला येणार आहे. याच वर्षी तिचे ‘अनन्या’ आणि ‘ ‘टाईमपास ३’ हे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशात या दोन्ही चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सध्या सुरू आहे.

 

‘टाईमपास ३’ मध्ये ती पालवी हे पात्र साकारणार आहे. चित्रपटात तिच्याबरोबर वैभव मांगले, प्रथमेश परब हे कलाकार दिसणार आहेत. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास ३’ या चित्रपटात हृता एका वेगळ्या आणि हटके अंदाजात पाहायला मिळेल. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button