मंगेशकर कुटुंबावर पुन्हा संकट; हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती खालावली

मुंबई | गेल्या काही महिन्यांपूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झाले आहे. खूप दिवस रूग्णालयात राहून देखील अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. लता दीदींच्या जाण्याने एका काळाचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे.

 

त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

24 एप्रिल रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंब आणि अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला हृदयनाथ मंगेशकर उपस्थित नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडले होते.

 

याबाबत बोलताना हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुलाने उत्तर दिले आहे. आदिनाथ म्हणाले की हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे शब्द कानावर पडल्यावर वातावरण शांत झाले.

 

हृदयनाथ मंगेशकर यांना कशामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि त्यांची प्रकृती सध्या कशी आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र चाहते चीतेंत पडल्यामुळे अनेकांना ईश्वराकडे दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button