आत्ताच्या घडामोडी

भारतीय वंशाच्या साऊथ आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटरचे निधन; क्रिकेट विश्वात पुन्हा शोककळा

दिल्ली | नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्गज ऑस्ट्रेलिया खेळाडू शेन वॉर्न याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने पूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम देखील आहेत. कसोटी मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो खेळाडू आहे.

 

शेन वॉर्न च्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गज खेळाडूचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हा देखील क्रिकेट विश्वाला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

 

भारतीय वंशाचे क्रिकेट पटू हुसेन आयुब यांचं निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचं निधन झाले आहे.

 

त्यांना किडनी चां आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. ते भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या निधनाने पूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. ते वरिष्ठ क्रिकेटर म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

अयुब यांना मोठ्या क्रिकेट मध्ये संधी मिळाली नाही, मात्र साऊथ आफ्रिका संघातून त्यांनी चांगली कामगिरी केली, 57हून अधिक विकेट त्यांनी त्यांच्या नावावर केले आहेत. ते एक फास्टर बॉलर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button