आत्ताच्या घडामोडी

सिनेसृष्टी पुन्हा हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; 100हून अधिक चित्रपटात केले होते काम

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेत आहेत. अनेकांनी या जगाला अलविदा केला आहे. यात बॉलिवूड, हॉलिवूड आणि मराठी अभिनय कलाकारांचा समावेश आहे. 2022 या वर्षात अनेकांना जगाचा निरोप घ्यावा लागला आहे.

 

या वर्षात बंगाली, तेलगू, हिंदी आणि मराठी सिने सृष्टीतील अनेक दिग्गजांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघण्यासाठी अनेक वर्ष लागतील असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. लता मंगेशकर, रमेश देव यांच्या सारख्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

मागील काही दिवसांपूर्वी तीन बंगाली अभिनेत्रींचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना, आणखी एका हॉलिवूड अभिनेत्याचे निधन झाले आहे. हा अभिनेता जगप्रसिध्द होता. वयाच्या 80व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

 

बॉलिवुड अभिनेते बो हॉपकिंस यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने जगातले अभिनय क्षेत्र हादरले आहे. बो यांनी 100हून अधिक चित्रपटात भूमिका साकारली होती.

 

हॉलिवूड मधील ते जेष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांना खरी ओळख अमेरिकन ग्राफिटी या चित्रपटात मिळाली, त्यांनी 1969 रोजी द वाईल्ड बंच या चित्रपट काम करून आपल्या करियर ची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले.

 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तरी देखील त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यांच्या निधनानंतर जगातील अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button