आत्ताच्या घडामोडी

50 वय झाले तरी ‘या’ अभिनेत्रींनी केले नाही लग्न; कारण वाचून धक्काच बसेल

मुंबई | लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. अशात आपल्या भारतीय संस्कृतीत कन्यादान हे सर्वात मोठं कर्त्यव्य मानल जातं. पूर्वीच्या काळी अनेक मुलींचे लग्न हे फार कमी वयात होत होते. मात्र आता अनेक मुली शिक्षण आणि करिअर साठी लग्न हा विषय थोडा दूर ठेवताना दिसतात.

 

तर काही मुली त्यांना जो जोडीदार आवडतो त्याच्याशीच लग्न करणार असं ठरवतात तर काहींच्या अपेक्षा खूप असल्यानं त्यांना हवा तसा जोडीदार मिळत नाही. परिणामी अनेक मुली आपली तिशी आणि पन्नाशी ओलांडून देखील कुवाऱ्या राहतात. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. आज या बातमीतून अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

 

• नर्गिस फाकरी –
या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे अभिनेत्री नर्गिस फाकरी. रॉकस्टार या चित्रपटातून तिने लाखो चाहत्यांची पसंती मिळवली. तिच्या अभिनयाने या चित्रपटासाठी चाहत्यांनी तिकीट बारिवर मोठी गर्दी केली होती. मोठी प्रसिद्धी मिळत असतानाच यावेळी तिचं नाव रणबीर बरोबर देखील जोडलं गेलं होतं. अशात ही अभिनेत्री ४२ वर्षांची आहे. मात्र तिच्या आवडीचा जोडीदार न मिळाल्याने ती अद्याप अविवाहित आहे.

 

• साक्षी तन्वर –
साक्षी ही सध्याच्या काळात आघाडीची अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म देखील चांगलचं गाजवलं आहे. साक्षी आधीपासूनच आपल्या करीअरसाठी खूप सिरिअस आहे. लग्न, संसार या मध्ये तिला काडीमात्र रस नाही. त्यामुळेच तिने एक मुलगी देखील दत्तक घेतली आहे. आपल्या मुलीसह ती खूप सुंदर आयुष्य जगते. सध्या तिचं वय ४९ झालं आहे. पण तिनेही लग्न काही केलं नाही.

 

• तनिषा मुखर्जी –
या यादीत चौथ्या क्रांकावर काजोलची बहीण तनिषाचा नंबर लागतो. ती सध्या ४४ वर्षांची आहे. बिग बॉसमध्ये असताना अरमान कोहली बरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू होत्या. या दोघांनी काही दिवस एकमेकांना डेट देखील केलं. मात्र काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

• अमिषा पटेल –
अमिषा अविवाहित अभिनेत्रींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. अमिषा ही तिच्या पहिल्याच चित्रपटातून खूप हिट झाली. कहो ना प्यार है हा तिचा पहिला चित्रपट होता. अमिषा ४५ वर्षांची आहे. आता पर्यंत तिचे नाव विक्रम भट्ट पासून रणबीर बरोबर जोडले गेले आहे. मात्र अद्याप ती कुमारी आहे.

 

• सुश्मिता सेन –
दुसऱ्या क्रमांकावर येते मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन. नव्वदच्या दशकात ती खूप गाजली. ती आता ४६ वर्षांची आहे. गेले बरेच दिवस ती रोहमनला डेट करत होती. मात्र तिचेही अजून लग्न झालेले नाही. तिने खूप आधी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. या दोन्ही मुलींसह ती सिंगल मदर म्हणून खूप छान आयुष्य जगते.

 

• तब्बू –
मंडळी पहिल्या क्रमांकावर येते अभिनेत्री तब्बू. ती ५१ वर्षांची आहे. तिने ९० चे दशक तर गाजवलेच पण आजही ती सिनेसृष्टीत सक्रिय आहे. आता पर्यंत तिच्या आयुष्यात तीन पुरुष येऊन गेले. ज्यामध्ये संजय कपूर, साजिद नाडियादवाला आणि नागार्जुन यांची नावे आहेत. या तिघांवर तिने मनापासून प्रेम केलं. मात्र ही गोष्ट लग्नापर्यंत कधीच पोहचली नाही. सध्या ती मिस्टर परफेक्टच्या शोधत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button