‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील भाग्यश्री देत आहे मृत्यूशी झुंज; डॉक्टर म्हणाले….

मुंबई | अभिनेत्री भाग्यश्री नव्हाळे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना आयुष्यातील आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींची माहिती देत असते. अशात ही अभिनेत्री सध्या एका मोठ्या गंभीर आजाराला तोंड देत आहे. या बातमीतून तिच्याविषयी अधिक जाणून घेऊ.

 

फुलला सुगंध मातीचा या मालिकेतून भाग्यश्रीला मोठी पसंती मिळाली. या नंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले मात्र फुलला सुगंध मातीचा ही मालिका तिला घराघरात घेऊन गेली. अशात आता ही अभिनेत्री मरण यातनांशी झुंज देत आहे. याविषयीची माहिती तिने स्वतः दिली आहे.

 

भाग्यश्रीला तिच्या शरीरात अचानक मोठ्या वेदना जाणवतात. ज्याचा तिला खूप त्रास होतो. या वेदना इतक्या असह्य आहेत की, यात तिला तिचा जीव गमवावा लागेल की काय असं तिला वाटते. वेदना जास्त होत असल्याने तिने एमाराऊ काढला आहे.

 

एमआरआयमध्ये तिला पेन्सोमनिया या आजाराने ग्रासले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला खूप विश्रांती घेण्यास सांगितले आहे. म्हणूनच अभिनेत्रीने तिच्या हातातली सगळी कामं सोडली आहेत. आणि अध्या ती रजेवर आहे.

 

सध्या तिचे कुटुंबीय तिची काळजी घेत आहेत. अभिनेत्रीला होत असलेल्या वेदना खूप जास्त आहेत. मात्र आता औषधोपचार घेऊन तिची प्रकृती स्थिरावली आहे. पण तिला होणारा त्रास पूर्णतः मिटलेला नाही. त्यामुळे ती स्वतः ला कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

ती कुठेतरी व्यस्त राहिली तर तिला होणाऱ्या वेदनांचा थोडा विसर पडेल असं तिला वाटतं आहे. त्यामुळे नुकतीच ती एका ट्रीपला गेली होती. तिचा भाऊ तिला ट्रीपसाठी घेऊन गेला होता.

 

प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करत असतो. भाग्यश्रीचा भाऊ देखील तिची खूप काळजी घेतो. त्यामुळेच तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. आता यावर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावाचे आभार मानले आहेत.

 

तिने म्हटलं आहे की, ” दादा, माझ्या चेहऱ्यावरचं दुःख तुला पाहता येतं, मी भाग्यवान आहे मला तुमच्यासारखी माणसं भेटली. खूप धन्यवाद वहिनी आणि अर्णव, तुम्ही माझ्या पाठीचा कणा आहात.” चाहते तिच्या या पोस्टवर भावूक झाले आहेत. अनेक जण तिला लवकरात लवकर थीम होण्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button