आत्ताच्या घडामोडी

चित्रपटसृष्टी हादरली! १००हून अधिक चित्रपटात काम केलेल्या प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

दिल्ली | अपयश आणि नैराश्य या दोन अशा गोष्टी आहेत ज्यामुळे अगदी मोठ्या काळजाची व्यक्ती देखील खचून जाते. सतत पदरी पडणारे अपशय झेलू न शकल्याने अखेर अनेक जण या दुनियेला कंटाळतात आणि कायमचे दूर निघून जातात.

मनोरंजन विश्वात अशा अनेक गोष्टी घडत असतात. मनोरंजन हे एक असे विश्व आहे जिथे प्रत्येकाला आपल एक स्थान निर्माण करावं वाटत. बऱ्याच व्यक्ती तस करतात देखील मात्र समोर जे दिसत असतं त्याच्या अगदी विरुद्ध त्यांचं आयुष्य सुरू असतं. बॉलिवूडमध्ये  सुशांत सिंग राजपूत हा याचं एक मोठं उदाहरण बनून आपल्याला कायमच सोडून गेला आहे.

आता अशीच आणखीन एक घटना सिनेसृष्टीत घडली आहे. ही घटना अशी आहे की, भल्या भल्यांना त्यावर विश्वास बसत नाहीये. कारण त्या अभिनेत्याने मृत्यूच्या अगदी काही मिनिटे आधी आपल्या मुलीला आणि पत्नीला बाय असा मेसेज केला होता. या मेसेजच्या अगदी दुसऱ्या मिनटाला  त्या अभिनेता बरोबर अनुचित प्रकार घडला आहे.

मल्याळम सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते रायमोहन परिदा यांचे शनिवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची धक्कादायक गोष्ट अशी की, त्यांनी नुकताच त्यांच्या मुलीला आणि पत्नीला बाय असा मेसेज केला आणि त्यानंतर त्यांची प्राण ज्योत
मालवली.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते गेल्या बऱ्याच काळापासून एकटे राहत होते. त्यांच्या जीवनात बरीच उलथापालथ सुरू होती. नैराश्याने त्यांना रात्र रात्रभर झोप देखील येत नव्हती. या परिस्थितीत ते घरात एकटेच राहात होते. त्यांची पत्नी आणि मुलगी दुसरीकडे राहत होते.

त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना त्यांच्या मृत्यूची खबर कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पुढील तपासासाठी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.  त्यांचा मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरी मिळाला. भुवनेश्वर प्राची विहार येथे रायमोहन गेल्या काही दिवसांपासून एकटेच राहत होते.

त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय तसेच चहा दे आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती भावूक झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून अद्यापही मृत्युचं खरं कारण समजलेले नाही.

रायमोहन यांनी आजवर तब्बल १०० चित्रपटांत काम केल आहे. त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिस मोठी कमाई करायचे. मल्याळम आणि तेलुगू त्यांचे सर्वाधिक चित्रपट आहेत. आपल्या हरहुन्नरी अभिनयाप्रमाणेच ते प्रत्येक चित्रपटासाठी मोठे मानधन देखील घेत होते.

सागर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पहिला चित्रपटात त्यांना घवघवीत यश मिळाले. त्यानंतर त्यांची प्रसिध्दी आणखीनच वाढली. एकापाठोपाठ एक असे हिट चित्रपट त्यांनी या सिनेसृष्टीला दिले. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी छोटा आणि मोठा पडदा चांगलाच गाजवला.

त्यांच्या अभिनयातील कारकीर्द फार मोठी होती. त्यामुळेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पटनायक यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे.

रायमोहन परिदा यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सगळीकडे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतानाच्या पोस्ट दिसत आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू असून ही आत्महत्या आहे की घातपात हे लवकरच समजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button