आत्ताच्या घडामोडी

देश हादरला! प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ५८व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आणखीन एक अभिनेत्रीने काल सोमवारी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री रुग्णालयात असताना तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेविश्वतील अनेक कलाकारांचे निधन होत आहे. अशात आता आणखीन एक अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे.

अंबिका राव असं त्यांच नाव असून त्या ५८ वर्षांच्या होत्या. एर्नाकुलम येथील जाळच्याच एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र २७ जूनची रात्र त्याच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटीव आला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र कोरोना बरोबरची ही झुंज त्या हरल्या. अशात त्यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कारकीर्द फार मोठी आहे. अभिनेत्रीसह त्या एक उत्तम निर्मात्या देखील होत्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कुंबलंगी नाईट्स, शमराणा आणि वाइरस आशा चित्रपटांच्या दिग्दर्शनसाठी त्या ओळखल्या जात होत्या. तसेच त्यांनी ममूटी, पृथ्वीराज सुकुमारन आणि दिलीप आशा अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केलेली आहे.

अंबिका राव यांची दोन मूल आहेत. आपल्या आईच्या निधनाने त्यांना शोक अनावर झाला आहे. साल २००२ मध्ये बालचंद्र मेनन अभिनीत आलेला चित्रपट कृष्ण गोपाल कृष्ण यामधून त्यांनी पहिल्यांदा निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवल होतं. राजमानिक्यम, मीशा माधवन, नमक और काली मिर्च, अनुरागा करिक्किन वेल्लम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.

त्यांच्या निधनाने आता त्यांच्या परिवरवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. कोरोना महामारी आता पुन्हा एकदा डोक वर काढत आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात आता पर्यंत कोरोनामुळे अनेक कलाकार दगावले आहेत.

यामध्ये अभिलाषा पटेल, अमित मिस्त्री, अनुपम श्याम, आरविंद त्रिवेदि, विक्रमजीत, चंद्रशेखर, दिलीप कुमार, फरूख जफार, घनश्याम नायक, किशोर नंदळसारकर, आशा अनेक कालाकारांनी कोरोनामुळे या जगाचा निरीप घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button