एकनाथ शिंदेंच एक टोकाचं पाऊल आणि ऐन पावसाळ्यात तापलेलं राजकारण; शिंदेंनी असं गाठलं गुजरात

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. काल रात्री एकीकडे सेनीची मतं फुटत होती तर दुसरीकडे सेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठलं. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आणखीन २५ हून अधिक आमदार गुजरातला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

या सर्व प्रकारावरून एकनाथ शिंदे यांची नाराजी स्पष्ट दिसते आहे. विधानपरषदेच्या निवडणुकीत त्यांना पक्षाने डावलले असल्याने ते २५ आमदारांसह नॉट रीचेबल झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई सेनेच्या ताब्यात आहे. अशात मुंबईचा बालेकिल्ला ठाणे जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला मोठी साथ दिली.

 

मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याचं समजत आहे. त्यामुळेच काल निकाल जाहीर होत असताना पासून ते नॉटरीचेबल झाले आहेत. शिंदे यांच्याशी कोणताच संपर्क होत नाही अशात मतं देखील फुटली या मुळे राजकारणात मोठा भूकंप आलेला पाहायला मिळाला.

 

• कसे गेले शिंदे सुरतला
एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सुरत गाठण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी सुरतच्या फ्लाईटच तिकीट बुक केलं. त्यानंतर आपल्या बरोबर काही आमदारांना घेऊन रात्री दीड वाजता सुरतला पोहचले. त्यांच्या आधीच ११ आमदार तिथे पोहचले होते. इथे आल्यावर सुरतमधील एका बड्या भाजपच्या नेत्याबरोबर शिंदे आणि इतर २५ आमदारांची बैठक झाली.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक भाजप नेत्यांकडून शिंदे आणि इतर २५ आमदारांना मदत करण्यात आली आहे. आता शिंदे यांनी सुरतमधील जे हॉटेल राहण्यासाठी निवडले आहे त्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदे यांनी स्वतः हा बंदोबस्त तैनात केला आहे. ते नॉट रीचेबल आमदारांना घेऊन मेरिडियन हॉटेलमध्ये थांबले आहेत.

 

एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यांनी घेतलेलं एक टोकाचं पाऊल ठाकरे सरकारला खूप महागात पडू शकतं. असं अनेक जाणकार म्हणत आहेत. त्यामुळे शिंदे नॉट रिचेबल २५ आमदारांसह कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button