आत्ताच्या घडामोडी

जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री, ती निघाली दिव्या भारतीची बहिण

दिल्ली | दिव्या भारती बॉलिवूडमधलं एक असं नाव जे आजही अजरामर आहे. दिव्याने तिच्या कारकीर्दीत अगदी थोडे मात्र यशस्वी आणि हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले. त्या काळी नवीन असून देखील तिने माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी सारख्या अभिनेत्रींना सौंदर्य तसेच अभिनयात टक्कर दिली होती.

दिव्या अगदी थोड्याच कालावधीत हिट झाली. मात्र अचानक झालेल्या तिच्या मृत्यूने अनेकांच्या मनात शंकेची पाल अजूनही चुकचुकत आहे. अशात आता दिव्याची बहीण देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिची बहीण देखील तिच्या प्रमाणेच दिसायला फार सुंदर आहे. आज या बातमीमधून तिच्या बहिनिविषयी जाणून घेणार आहोत.

 

कायनात अरोरा ही दिव्याची मावस बहीण आहे. तिने देखील हिंदी तसेच पंजाबी भाषांमधील काही चित्रपटांत काम केलं आहे. ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात देखील ती झळकली होती. यामध्ये तिच्या बरोबर आणखीन २०० अभिनेत्री ऑडिशनला आल्या होत्या. मात्र आपल्या सौंदर्याने तिने या २०० मुलींना मागे टाकले आणि चित्रपट स्वताच्या नावे करून घेतला.

 

‘ग्रँड मस्ती’ हा बॉलिवूडमधील तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर गप्पी गोरेवल यांच्या ‘फरार’ या पंजाबी चित्रपटात देखील तिला अभिनय करण्याची संधी मिळाली. तिचा डेब्यू चित्रपट ‘ग्रँड मस्ती’ असला तरी या आधी ती ‘खट्टा मिठा’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसली होती.

 

कायनात ने आता पर्यंत एकूण नऊ चित्रपटांत काम केलं आहे. ज्यामध्ये हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलगू आणि पंजाबी भाषिक चित्रपटांचा समावेश आहे. दिव्या यांच्या निधनाने पूर्ण देशात शोककळा पाळण्यात आली होती. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्राला मोठं भगदाड पडलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button