बिग बॉस विजेत्या अभिनेत्रीवर आलीय खुपचं वाईट वेळ; उपजिविकेसाठी काढावं लागतंय रुग्णालयात झाडून?

मुंबई | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही खऱ्या स्वरूपाचे असतात. तर काही मनोरंजनाच्या हेतूने बनविले असतात. तर काही खोटे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. एका दवाखान्यात बीग बॉस विजेती अभिनेत्री झाडून काढत असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बीग बॉस ओटीटी मध्ये धुमाकूळ घातलेली दिव्या अग्रवाल आहे. तिच्यावर एवढे वाईट दिवस कसे आले? असा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. कारण हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिव्या ही छोट्या पडद्यावर आणि सोशल मीडियावर मोठी झालेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या मेहनतीवर बीग बॉसचा मुकुट मिळविला आहे. आणि यातून तिने मोठी कमाई देखील केली आहे. मात्र तरी ती झाडून काढत असल्याचा फोटो समोर आल्याने धक्काच बसला आहे.
मात्र दिव्याचा व्हायरल होत असलेला फोटो हा एका शुट्टींग दरम्यान काढलेला आहे. या शुटींग मध्ये ती वेग वेगळ्या स्वरूपात दिसली आहे. सध्या तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. खुद्द तिने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे.