आत्ताच्या घडामोडी

चिंताजनक! दिपीका पादुकोणची प्रकृती बिघडली; उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल

दिल्ली | बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण विषयी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. अचानक तब्येत बिघडल्याने दीपिकाला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

 

दीपिकाने आजवर अनेक हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. अशात सध्या ती तिच्या प्रोजेक्ट के या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काल शुटींग सुरू असतानाच अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला खूप त्रास होऊ लागला.

 

प्रोजेक्ट के या चित्रपटाच्या शुटींगवेळी दीपिकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. नंतर तिच्या हृदयाचे ठोके देखील वाढू लागले. यामुळे नंतर जास्त त्रास झाल्यावर सेटवर आसलेल्या व्यक्तींनी तिला रुग्णालयात दाखल केले.

 

दीपिकाने आपल्या या प्रसंगाबद्दल कोणतीही ऑफिशिल माहिती दिलेली नाही. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आता ठीक आहे. तिला जास्त त्रास जाणवत नाही.

 

दीपिका पदुकोण ही २०२३ मध्ये अनेक चित्रपटात काम करणार आहे. यासाठी ती चित्रपटांच्या शुटींगमध्ये खूप व्यस्त आहे. तसेच तिच्या पुढील एका चित्रपटामध्ये ती ऋतिक रोशन बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

 

लवकरच ती आपल्याला सर्कस, पठाण आणि प्रोजेक्ट के मध्ये अभिनय करताना दिसेल. यातील सर्कस या चित्रपटात ती पती रणवीर सिंग बरोबर अभिनय करणार आहे. तर प्रोजेक्ट के या चित्रपटात ती प्रभास बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

 

प्रोजेक्ट के मध्ये बिग बी देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट तेलगू भाषेत बनत आहे. तर पठाण या चित्रपटात दीपिका आणि शाहरुख खान एकत्र काम करताना दिसतील. या आधी देखील बऱ्याच चित्रपटांत तिने शाहरुख खान बरोबर काम केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button