आत्ताच्या घडामोडी

त्या एका चुकीमुळे ‘या’ अभिनेत्यावर आलीय खूप वाईट वेळ?

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपटात गुंडाची भूमिका साकारणारे दीपक शिर्के तुम्हाला आठवत असतील. त्यांनी शेकडो चित्रपटात गुंडाची भूमिका साकारली आहे. तसेच ते काही चित्रपटात पोलिसाची भूमिका देखील साकारताना पाहायला मिळाले.

 

त्यांनी धडाकेबाज या चित्रपटात काम करून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. धडाकेबाज हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील पहिला चित्रपट होता. मात्र त्यांचा अभिनय जुना अभिनेता असल्या सारखा होता.

 

त्यामुळे शिर्के हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटापासून चांगलेच चर्चेत आले. त्यांना लहान पणी पोलिस बनायचे होते. त्यांच्या शाळेच्या मागील बाजूस एक चित्रमंदिर होते. ते त्या थिएटर मध्ये चित्रपट आणि नाटक पाहायला जाऊ लागले.

 

त्यानंतर त्यांना अभिनय क्षेत्राची चांगलीच गोडी लागली. त्यानंतर त्यांनी त्याच थिएटर मध्ये अभिनयाची प्रॅक्टिस करण्यास सुरू केली. हळूहळू ते नाटकांमध्ये काम करू लागले. आणि त्यांचा अभिनय सर्वत्र प्रचलित होऊ लागला.

 

त्यानंतर त्यांना धडाकेबाज या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्यांनी त्या चित्रपटांत काम केले आणि त्यांच्या नावाची लोकांना भुरळ पडली, कला प्रेमी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

 

त्यांना खरी पसंती मिळाली ती म्हणजे तिरंगा या चित्रपटातून, कारणं देशावर बनवण्यात आलेल्या चित्रपटांपैकी तो चित्रपट सर्वाधिक वेगळा आणि काळजी धडकी भरवणारा होता. त्या चित्रपटात त्यांनी गेंडास्वामी या पत्राची भूमिका साकारली.

 

या चित्रपटाने ते सर्वत्र प्रचलित झाले. त्यानंतर त्यांना शेकडो चित्रपटात काम मिळाले. मात्र सध्या ते पहिल्या सारखे चर्चेत नसतात. त्यांचा चाहता वर्ग अजून सुद्धा आहे. मात्र चाहत्यांशी त्यांचा संवाद कधीही होत नाही.

 

सध्या त्यांना बड्या चित्रपटांत काम मिळत नसल्याची चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना मोठ्या चित्रपटात काम मिळत नाही. अभिनय क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर स्वतःच्या जाहिराती कडे विशेष लक्ष द्यावं लागतं.

 

सोशल मीडियावर कायम ॲक्टीव असावं लागतं. मात्र दीपक शिर्के हे कधी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली. आणि या कारणांमुळे त्यांना काम मिळत नसल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button