आत्ताच्या घडामोडी

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीवर पसरला दुःखाचा डोंगर

मुंबई | दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे स्वानंदी तसेच तिच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. यामध्ये ती तिच्या मामा बरोबर गप्पा गोष्टी करताना दिसत आहे.

 

तिने या व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिच्या मामाचं निधन झाल्याचं सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. व्हिडियोमधून मामा भाचीच्या नात्यात किती गोडवा आणि मैत्री आहे हे समजते.

 

स्वानंदीने आजवर अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. आभाळमाया ही तिची पहिली मालिका होती. यात ती बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्या नंतर ती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत झळकली याच मालिकेने तिला प्रसिध्दी मिळाली.

 

दिल दोस्ती दुनियादारी ही मैत्रीवर आधारित एक मालिका होती. यामध्ये स्वानंदी मीनल हे पात्र साकारत होती. आपल्या अभिनयाने तिने या पात्राला पूर्णपणे न्याय दिला होता.

 

आता पर्यंत तिने दिल दोस्ती दोबारा, अस माहेर नको ग बाई, सिंगिंग स्टार, इंडियन आयडॉल मराठी अशा अनेक कार्यक्रमांत ती झळकली आहे. तिचे वडील उदय टिकेकर हे देखील एक उत्तम अभिनेते आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button