कंगना राणावतच्या धाकड चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ; एका दिवसात विकली फक्त 20 तिकिटे

दिल्ली | बॉलिवूडची क्विन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणावत ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अशात नुकताच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षक खूप पसंती दाखवतात. तसेच तिचे चित्रपट हे तिकीटबारीवर भरघोस कमाई देखील करतात.

 

मात्र तिचा ‘धाकड’ हा चित्रपट याला अपवाद ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्या पासून फार काही कमाई करू शकलेला नाही. आणि चित्रपटाच्या आठव्या दिवशी तर, संपूर्ण भारत भरातून चित्रपटाची फक्त २० तिकिटे विकली गेली. त्यामुळे आठव्या दिवशी हा सिनेमा अवघे ४४२० रुपये कमवू शकला.

 

अशात २० मे रोजी कार्तिक आर्यन अभिनित ‘भूलभूलैया २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि कंगणाचा ‘धाकड’ देखील याच दिवशी चित्रपट गृहात आला. त्यामुळे प्रेक्षकांनी ‘भूलभुलैया २’ या चित्रपटाला जास्त पसंती दाखवली. आणि आज पाहता पाहता हा चित्रपट बॉक्सऑफीसवर हिट ठरला आहे. कांगणाच्या धाकडला या चित्रपटाने चांगलचं हणून पाडलं आहे. म्हणूनच ‘धाकड’ हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.

 

अशात अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानातून नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अशात आता तिचा चित्रपट फ्लॉप झल्याने अनेक नेटकरी तिला पुन्हा एकदा ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्यावर आणि तिच्या चित्रपटावर वेगवेगळे मिम्स व्हायरल होतं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button