आत्ताच्या घडामोडी

‘दे धक्का’ मधील गौरी झालीय मोठी, ओळखनही झालंय कठीण

मुंबई | प्रत्येक चित्रपट हिट होण्यासाठी त्यातील स्टार कास्ट तितकेच भक्कम असणे आवश्यक आहे. कलाकार जेवढा सुंदर अभिनय करतील तेवढाच चित्रपटाचा फायदा होत असतो. अशात या चित्रपटामध्ये अनेक बाल कलाकार देखील असतात. जे नंतर काय करतात आणि आता ते कसे दिसत आहेत हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडते.

 

दे धक्का हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल या चित्रपटात सर्वच कलाकार उत्तम होते. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या सर्वच कलारांनी अगदी दमदार अभिनयाने हा चित्रपट हिट ठरवला होता.

 

अशात यामध्ये असलेली चमुकली शुक्राची चांदणी म्हणजेच गौरी वैद्य आता खूप मोठी झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती मनोरंजन विश्वात फार दिसली नाही. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. यानंतर तिने आपल्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले.

 

तिने माटुंगा येथील डी.जी. रुपारेल कॉलेजमध्ये इंजीनियरिंग अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी साठी एडमिशन घेतले. यात आता तिने पदवी मिळवली आहे. शिक्षणाच्या आईचा घो या चित्रपटांमध्ये देखील गौरी झळकली होती. तसेच त्यानंतर साल २०११ मध्ये एकापेक्षा एक जोडीचा मामला या कार्यक्रमात ती आली होती.

 

साल २०१५ मध्ये आलेला चित्रपट आव्हान यामध्ये देखील तिने अभिनय केला. अशात त्यामध्ये तिने रूपा हे पात्र साकारले होते. आता गौरी खूप मोठी झाली आहे. तसेच ती खूप सुंदर दिसते. ग्लॅमरस आणि लाईमलाईट पासून ती दूर असली तरी तिचा साधेपणा सर्वांना भावणारा आहे. लवकरच ती तुम्हाला दे धक्का २ या चित्रपटात दिसेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button