‘या’ गाजलेल्या खेळाडूंना अपघातात गमवावा लागला आपला जीव

मुंबई | सायमंड्स क्रिकेट विश्वातील एक असा खेळाडू जो सतत वादाच्या विळख्यात राहूनही अनेकांच्या मनात होता. ऑस्ट्रेलियाचा तो एक ऑलराऊंदर खेळाडू होता. १५ मे २०२२ हा दिवस त्याच्या आयष्यातील खूप वाईट दिवस ठरला. याचं दिवशी त्याचा मोठा अपघात झाला आणि एवढा मोठा खेळाडू आपल्या सर्वांना सोडून गेला.
वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्याच निधन झालं. मात्र क्रिकेट विश्वातील तो एकमेव असा खेळाडू नाही त्याचा असा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या आधी देखील अनेक खेळाडूंनी अपघातामुळे या जगाचा निरोप घेतला आहे. आज त्यातीलच काही खेळाडूंविषयी जाणून घेऊ.
• कोली स्मिथ
अपघातात निधन पावलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये वेस्ट इंडीजच्या कोली स्मिथ यांचे नाव सर्व प्रथम घ्यावे लागेल. १९५९ मध्ये एक चॅरिटी मॅच खेळण्यासाठी चाललेल्या सोबर्स, स्मिथ आणि टॉम ड्युडनी यांच्या कारचा पहाटे अपघात झाला होता. त्यांची कार गुरांच्या एका गाडीला धडकली होती. त्यावेळी
सोबर्स गाडी चालवत होते. गाडी चालवत असताना अचानक त्यांच्या डोळ्यावर लाईट चमकली आणि त्यांचं गडीवरचं नियंत्रण सुटलं. त्यात त्यांचा अपघात झाला. मात्र सोबर्स आणि ड्युडनी यामध्ये बचावले. गाडीत मागच्या सीटवर स्मिथ बसले होते. या अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची लोकप्रियता एवढी जास्त होती की, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ६० हजारांहून अधिक लोकांची गर्दी उफाळून आली होती.
• रूनाको मॉरटन
मॉरटन हा एक असा खेळाडू होता जो चोकार आणि षटकारासह वन रण देखील खूप उत्तम घ्यायचा. वयाच्या ३३ व्या वर्षी त्याच निधन झालं. त्याचा देखील कार अपघातात मृत्यू झाला आहे. एक मॅच खेळून तो घरी निघाला होता त्यावेळेस त्याचा दुर्दैवी अपघात झाला.
• नजीब तारकाई
अपघातात निधन झालेल्या क्रिकेटर्सपैकी अफगाणिस्तानचा नजीब तारकाई हा एक आहे. २ ऑक्टोबर २०२० रोजी नजीबच्या कारचा जलालाबाद येथे अपघात झाला होता. अपघात झाल्यावर त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. चार दिवस त्याने मृत्यूशी दोन हात केले. मात्र, त्याची ही लढाई अपयशी ठरली. अवघ्या २९ वर्षांचा असताना त्याची प्राण ज्योत मालवली.
• बेन हॉलिओक
बेन हॉलिओक याचाही अपघाती मृत्यू झाला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी त्याचा कार अपघातात मृत्यू झाला. तो १९ वर्षांचा असताना इंग्लंडकडून तो पहिल्यांदा खेळला होता. २२ मार्च २००२ कार चालवत असताना त्याच नियंत्रण सुटल्याने तो भिंतीवर धडकला. यामध्ये त्याची प्रेयसी देखील होती. ती ३ वर्षे कोमात गेली होती.
• मंजूरल इस्माम राणा
बांगलादेशच्या मंजूरल इस्लाम राणा याने खूप कमी वयातच या जगाचा निरोप घेतला. त्याने बांगलादेशसाठी ६ टेस्ट आणि २२ वनडे खेळलेल्या आहेत. आपल्या मित्रा बरोबर तो एका हॉटेलमध्ये जेवायला चालला होता. त्यावेळी त्याची बाईक दुसऱ्या एका गाडीला धडकली यात त्या दोघांचाही मृत्यू झाला.
२००७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी बांगलादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्डकप खेळत होता. त्यावेळी त्यांनी भारताला हरवले होते. त्याच्या विजयात राणाचा फोटो त्यांनी संपूर्ण ग्राउंडमध्ये फिरवला होता.