चित्रपसृष्टी हादरली! प्रसिध्द कॉमेडी कलाकाराचे निधन

मुंबई | लोकप्रिय कॉमेडियन पाकिस्तानी अभिनेता मसूद ख्वाजा यांचे निधन झाले आहे. सोमवारी २० जून रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच त्यांचे चाहते आता शोक सागरात बुडले आहेत. मसूद ख्वाजा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या.

 

पाकिस्तानी कॉमेडियन मसूद ख्वाजा मरण पावल्याची बातमी आली तेव्हा अनेकांना त्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायचे होते. मसूद ख्वाजा हे एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता होते. त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घकाळ काम केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार मसूद ख्वाजा यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. ज्यामुळे त्यांना किडनी बदलण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता मसूद ख्वाजा यांचा मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

 

काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली होती. ही त्यांची शेवटची मुलाखत ठरली. मसूद ख्वाजा यांच्या निधनापूर्वी एका मंत्र्यानेही त्यांची भेट घेतली होती. त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू होते.

 

मात्र यातच पाकिस्तानी अभिनेते मसूद ख्वाजा यांचे निधन झाले. पाकिस्तानी अभिनेता मसूद ख्वाजा यांचे निधन झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि अभिनेत्यांनी त्यांचे शोक आणि दुःख सोशल मीडियावर व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

 

मसूद ख्वाजा यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते त्यांच्या गेस्ट हाऊस नाटकासाठी प्रसिद्ध होते. जे पाकिस्तान टेलिव्हिजनद्वारे प्रसारित केले गेले होते. मसूद ख्वाजा यांनी रावळपिंडी कला परिषदेत एक रंगमंच नाटकही सादर केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button