‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी दुःखत बातमी; दोन विनोदी कलाकारांनी सोडला मंच

मुंबई | चला हवा येऊ द्या या मराठी विनोदी कार्यक्रमाने आजवर अनेक रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. अशात आता या कार्यक्रमातील दोन विनोदी कलाकार या शोचा निरोप घेणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. यामध्ये कितपत तथ्य आहे तेच या बातमीतून जाणून घेणार आहोत.
नमस्कार….. मंडळी कसे आहात सगळे हसतायना…? आणि हसायलाच पाहिजे … अशा शब्दांत निलेश साबळे जेव्हा या शोची सुरुवात करतो तेव्हाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटते. अशात या शो मध्ये श्रेया बुगडे, सागर करंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम हे पट्टीचे विनोद वीर आहेत. आजवर यांनी महाराष्ट्रालाच नाही तर मोठ मोठ्या बॉलिवूडच्या कलाकारांना देखील हसवलं आहे.
भारत गणेशपुरे या शोमध्ये बऱ्याचदा आलेल्या पाहुण्यांचे आंबट गोड स्वागत करताना दिसले आहेत. अशात त्यांची बाप की अदालत अनेकांच्या पसंतीची आहे. त्यांनी केलेली विनोदी जजची भूमिका पाहून कितीही दुःखातला व्यक्ती असुदे तो हसणारचं.
अशात सागरची या शोमध्ये बातच और आहे. त्याने या शोमध्ये निळू फुले पासून ते अगदी बाहुबलीतील महाराणी बिन कामाची खतरनाक विनोदी अंदाजात साकारली आहे. एवढेच नाही तर सागरची स्वारगेट बाई देखील रसिक प्रेक्षकांना खूप भावली.
चला हवा येऊ द्या या शोचे हे दोन विनोद वीर म्हणजेच सागर आणि भारत हे आता सोनी टिव्ही वरील एका कार्यक्रमात दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये हे दोघे बुलाती है मगर जाणे का नाही… या गाण्यावर विनोद करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण अशी चर्चा करत आहेत की, या दोघांनी आता चला हवा येऊ द्या चा मंच सोडला आहे. मात्र ही फक्त एक अफवा आहे.
खरं पाहिलं तर सोनी टिव्ही वरील हिंदी कॉमेडी शोमध्ये हे दोघे फक्त शनिवर आणि रविवारी झळकणार आहेत. त्यामुळे त्यांना चला हवा येऊ द्या सोडण्याची गरज नाही. ते दोन्ही ठिकाणी आपली वेळ व्यवस्थित सांभाळू शकतात. आणि ते दोघेही तसच करणार आहे. दोन्ही ठिकाणी ते आपल्या विनोदाचे फटाके फोडण्यात आहे.
अशात सोनी टिव्ही वरील या कार्यक्रमात अर्चना पुराण सिंग आणि शेखर सुसन जजच्या खुर्चीची धुरा सांभाळत आहेत. या शोमध्ये देखील आपले मराठी विनोद वीर दाखल होणार असल्याने याची खूप चर्चा होत आहे. चाहते आणि प्रेक्षक सागर आणि भारत या दोघांची हिंदीमधील कॉमेडी पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर या दोघांचा विनोद तुम्हाला दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता सोनी टिव्हीवर पाहायला मिळेल.