आत्ताच्या घडामोडी

देव दर्शनासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घातला घाला; परिसरात शोककळा

मुंबई | मृत्यू कधी कुठे आणि कसा चालून येईल याचा काहीच नेम नाही. त्यामुळे आलेला दिवस आनंदात जगावा असं अनेक जण म्हणतात. याचीच प्रचिती एका बहीण भावाला आली आहे.

 

एक कुटुंब देवदर्शनाला निघालं होतं. कारमध्ये पाच व्यक्ती बसल्या होत्या. त्यात हे दोघे बहीण बाहू देखील होते. सर्व जण देवीच्या दर्शनाला हसत हसत मज्जा करत प्रवास करत होते.

 

आशत रात्रीची वेळ झाली. गाडी रात्रीचा काळा कुट्ट अंधार कापत वेगाने चालली होती. यावेळी अचानक गाडी स्लीप झाली आणि त्यातील सर्व जण गंभीर जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला.

 

ही घटना समजल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी (मुफसिल परिसर) धाव घेतली. कारमध्ये एकूण पाच व्यक्ती प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अमन कुमार त्याची पत्नी मोनिका मुलगी अनिक मुलगा मनीष आणि बहीण राखी या व्यक्ती प्रवास करत होत्या.

 

कार अनिश चालवत होता. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने रस्त्यावर असलेली वाळू त्याला दिसली नाही. त्यामुळे वाळू वरून गाडी स्लीप झाली आणि समोर असलेल्या झाडाला धाडकन आदळली. यावेळी अनिश आणि त्याची बहीण रेखा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 

तर अनिशची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे तिघे देखील गंभीर जखली झाले. त्यामुळे त्यांना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button