आत्ताच्या घडामोडी

एक बाळ झाल्यानंतर पतीला सोडलं; आता प्रसिध्द बॉलिवुड अभिनेत्री ‘या’ अभिनेत्यावर करतेय जिवापाड प्रेम

दिल्ली | बॉलिवूडमधील झगमग आणि तिथली छानछौकी सर्वांनाच हवीहवशी वाटते. अशात बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अनेक लग्न केली आहेत.

 

इथे बहुसंख्य कलाकार हे प्रेमाच्या बाबतीत जरा वेगळ्याच विचारांचे आहेत. खूप कमी कलाकार एकाच जोडीदाराबोबर आपलं आयुष्य जगतात. अनेक कलाकार हे पहिला पती किंवा पत्नी असून देखील दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडतात.

 

मग यामध्ये अनेकदा ते आपल्या पहिल्या साथीदाराला सोडून देतात. ज्याची कारण फार मोठी नसली तरी अनेक जण एका एकमेकांशी पटत नसल्याने दुसऱ्या जोडीदाराच्या शोधत असतात. त्यातीलच एक अभिनेत्री एमी जॅक्सन.

 

एमी ही बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक मोठी अभिनेत्री आहे. तिने आता पर्यंत काही मोजकेच चित्रपट केले आहेत. मात्र तिच्या सर्वच चित्रपटांनी तिकीट बारीवर मोठी कमाई केली आहे. सध्या एमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

 

आणि तिचं चर्चेत येण्याचं कारण हे तिचा अभिनय नाही तर सोशल मीडियावरील तिचे फोटो आहेत. एमी ही एका बाळाची आई आहे. जॉर्ज पनायिओटौ यांच्या बरोबर ती बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होती.

 

या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. त्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली. तिने एका बाळाला जन्म देखील दिला. मात्र आता ती तिच्या बाळाच्या वडिलांबरोबर राहत नाही.

 

या दोघांचे बाळाच्या जन्माआधीच ब्रेकअप झाले आहे. अशात आता एमी एड वेस्टविकबरोबर दिसली आहे. त्याच्या बरोबर तिला अनेक वेळा स्पॉट केलं गेलं आहे. या दोघांचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यास असे समजते की, हे दोघे एमेकांच्या प्रेमात आहेत.

 

गेल्या अनेक दिवसांपासून एमी एड वेस्टविकला डेट करत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळेच आता या दोघांच्या नात्याची मोठी चर्चा होताना दिसते.

 

एमीने साल २०१० मध्ये आलेला तमिळ चित्रपट मद्रासपट्टिनम मधून सिनेसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर तिने एक था दिवाना, थांडवम, आय, सिंग इज ब्लिंग, २.० अशा अनेक चित्रपटांमधून अभिनय केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button