आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूडमधील तुमचा आवडता कलाकार कितवी शिकला आहे; कोणी दहावी तर कोणी पदवीधर

दिल्ली | चांगली नोकरी मिळवण्यासाठी एक लहान मुलं शाळेत आहे तेव्हापासूनच त्याला चांगले आणि उच्च शिक्षण घेण्याचे धडे दिले जातात. कारण प्रत्येकच क्षेत्रात शिक्षणाला फार मोठी किंमत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? असं एक क्षेत्र आहे जिथे शिक्षण नाही तर तुमच्यातील कला पाहिली जाते.

 

होय! ते क्षेत्र म्हणजे बॉलिवूड. इथे येणार कोणताही व्यक्ती पदवीधर आहे की ५ वी नापास आहे हे कोणीही विचारत नाही. इथे फक्त फक्त अभिनय उत्तम येत आहे का हेच पाहिलं जातं. त्यामुळे आज या बातमीतून बॉलिवूडच्या काही कलाकारांचे शिक्षण पाहणार आहोत.

 

• शाहरुख खान –
बॉलिवूडचा किंग खान देखील काही कमी शिकलेला नाही. त्याने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेण्यासाठी त्याने जमिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.

 

• प्रियांका चोप्रा –
प्रियांकाने आपलं १२ वी पर्यंतच शिक्षण बरेली येथील आर्मी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर देखील तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे होते. मात्र तेव्हाच मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करून घेतला आणि तिच्या शिक्षणाला ब्रेक लागला.

 

• आलिया भट्ट –
आलियाचं जीके कसं आहे हे तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर पहिलच असेल. अशात खूप लहान वयात ती बॉलिवूडमध्ये आली. जमनाबई नरसी येथून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आलिया १२ वी उत्तीर्ण आहे.

 

• अनुष्का शर्मा – 
विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा उच्च शिक्षित आहे. तिने बेंगलोरच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून बॅचलर डिग्री घेतली आहे. तर इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स देखील केलं आहे.

 

• आमिर खान –
“कमियाब होने के लिये नही काबिल होने के लिये पढो…..” हा डायलॉग अगदी जसाच्या तसा अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात देखील जगला आहे. त्याला अभ्यासाची फार आवड नव्हती त्यात त्याला अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने फक्त १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

 

• कंगना राणावत –
कंगना देखील अभ्यासात हुशार होती. तिने सायन्स घेतलं होतं. वैद्यकीय क्षेत्रात तिला नाव कमवायच होतं. मात्र रसायनशास्त्रमध्ये ती नापास झाली. त्यामुळे तिने करीअरची दिशा वळवण्याचा निर्णय घेतला.

 

• अक्षय कुमार –
खिलाडी भय्याला देखील अभ्यास कधीच आवडला नाही. त्याने डॉन बॉस्को स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. नंतर पुढील शिक्षण देखील तो घेत होता पण शिक्षणात त्याचं मन लागत नसल्याने तो बँकॉकला रवाना झाला. तिथे त्याने मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं.

 

• सोनम कपूर –
सोनम कपूर ही अभ्यासात हुशार होती. तिला वेगवेगळे विषय जाणून घेण्याची आवड होती. तिचं शालेय शिक्षण हे सिंगापूर येथे पूर्ण झालं. त्यानंतर पूर्व लंडनमधून तिने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत पदवी संपादन केली आहे.

 

• कतरीना कैफ –
कतरीना ही आज बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचं इंग्रजी ऐकून अनेकांना ती किती उच्च शिक्षित असेल असं वाटतं. मात्र कुटुंबाच्या सततच्या स्थलांतरणाने तिचं शालेय शिक्षण देखील झालेलं नाहीं तिचा छोटा मोठा अभ्यास तिच्या आईने घरीच करून घेतला आहे.

 

• अमिताभ बच्चन –
अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमधील जन्ना प्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमधून सुरुवातीचे शालेय शिक्षण घेतले. यानंतर बिग बींनी नैनितालच्या शेरवुड कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली येथील किरोरी माल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.
अमिताभ बच्चन हे विज्ञान विषयातील पदवीधर आहेत. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाकडून त्यांना ही पदवी मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button